हे आहेत भाजपचे नवे कार्यकारी अध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 June 2019
  • शहा यांच्याकडेच अध्यक्षपदाची सूत्रे राहणार

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आरोग्यमंत्री जगतप्रकाश ऊर्फ जे. पी. नड्डा (य ५९) यांची पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून सोमवारी नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या संसदीय मंडळाच्या सोमवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नड्डा यांचे नाव नव्या पक्षाध्यक्ष पदाच्या शर्यतीत अग्रेसर असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने यापूर्वीच दिले आहे.

पक्षाध्यक्ष अमित शहा केंद्रीय मंत्रिमंडळात गृहमंत्रिपदावर गेल्यानंतर व त्यांचा दुसऱ्या वेळेचाही कार्यकाळ संपत आल्याने नव्या पक्षाध्यक्षांकडे सूत्रे देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी; तसेच शहा यांनी घेतला. मात्र नड्डा यांना कार्यकारी अध्यक्ष बनविल्याने तूर्त शहा यांच्याकडेच अध्यक्षपदाची सूत्रे राहणार हे स्पष्ट आहे. भाजप संघटनात्मक निवडणुका होईपर्यंत ते या पदावर राहतील, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News