महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी निवडणुकांसाठी मिळणार नाही निधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 2 August 2019
  • विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसाठी महाविद्यालयांना विद्यापीठाकडून मिळावा, अशी मागणी प्राचार्यांनी केली होती

नागपूर - विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसाठी महाविद्यालयांना विद्यापीठाकडून मिळावा, अशी मागणी प्राचार्यांनी केली होती. हा विषय कुलगुरू डॉ. काणे यांनी उच्च व  तंत्रशिक्षण विभागासमोर मांडला. मात्र, विभागाने मागणी फेटाळल्याने महाविद्यालयांना स्वत:च्या खर्चातूनच निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार असल्याचे समजते.

विद्यापीठाला ३१ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पार पाडायच्या आहेत. यासाठी विद्यार्थी संघटनांच्या बैठकीचे चार दिवसांपूर्वी आयोजन केले होते. या बैठकीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीतून बाहेर निघण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी संघटनेला देण्यात आलेली माहिती पुस्तिका जाळून निषेध व्यक्‍त केला होता.

११ जुलैला झालेल्या प्राचार्यांच्या बैठकीत प्राचार्यांनी निवडणुकादरम्यान पाच वेगवेगळ्या रंगाच्या  मतपत्रिकांची छपाई आणि इतर साहित्यासाठी किमान दहा हजारांचा खर्च येणार असल्याने तो खर्च विद्यापीठाने द्यावा, अशी मागणी केली होती. यावर कुलगुरूंनी हे मुद्दे सरकारसमोर उपस्थित करणार असल्याचे वचन प्राचार्यांना दिले होते. काही दिवसांपूर्वीच उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे घेण्यात आलेल्या कुलगुरूंच्या बैठकीत हे सर्व मुद्दे विभागाकडून फेटाळण्यात आले. शिवाय महाविद्यालयांनी स्वखर्चाने निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता महाविद्यालयांवर निवडणुका निर्धोक पार पाडण्याची जबाबदारी राहणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News