एक अनोळखी जागा

  स्नेहल पवार, सातारा
Friday, 2 August 2019

आयुष्य पण किती गमतीशीर आहे ना, जन्माला आलेला प्रत्येक जीव ओळखीशिवाय राहू शकत नाही. आज आता जन्माला आलेली मुल कोणाच्यातरी नावाखाली ओळखीचं होतं, त्याला आपल्या आवडीच्या नावाने संबोधल जात आणि त्याची एक अनपेक्षित ओळख होते, जस जसे ते बाळ मोठे होऊ लागते त्याला अवगत असलेले कलागुण ते दाखवू लागत. त्याच्या आवडीच्या गोष्टी ते सतत करू पाहत. 

आयुष्य पण किती गमतीशीर आहे ना, जन्माला आलेला प्रत्येक जीव ओळखीशिवाय राहू शकत नाही. आज आता जन्माला आलेली मुल कोणाच्यातरी नावाखाली ओळखीचं होतं, त्याला आपल्या आवडीच्या नावाने संबोधल जात आणि त्याची एक अनपेक्षित ओळख होते, जस जसे ते बाळ मोठे होऊ लागते त्याला अवगत असलेले कलागुण ते दाखवू लागत. त्याच्या आवडीच्या गोष्टी ते सतत करू पाहत. 

मोठे झाल्यावर काही जण आपल्या आवडीच्या गोष्टीत नाव कमावतात आणि स्वतःची एक नवीन ओळख बनवतात आणि काहीजण भविष्याचा विचार करून मनाविरुद्ध का होईना पण एखाद्या गोष्टीत अगदी उत्तम कामगिरी पार पाडतात आणि स्वतःची ओळख बनवतात  ही ओळख बनवण्यासाठी ते  रात्रीचा दिवस करतात. 

ओळख बनत असते त्या दरम्यानचा प्रवास अगदी भारीच. त्यावेळी होणारी व्हाव्हा, मिळणारा  मोठेपणा आणि लोकांमध्ये चर्चेत असलेला मी या सर्व गोष्टी अगदी खूश करून टाकतात. अगदी एखाद फुलपाखरू रस ग्रहण करण्यासाठी  एका सुंदर फुलावर बसावं आणि ते फुल रसहीन झाल की भुरकन उडाव अगदी असच काहीतरी  आपल्या आयुष्यात होतं.

जोपर्यंत आपल्याला लाभलेली ओळख ही नवीन असते तोपर्यंत अगदी कस मन पारिजातका सारखं  फुललेलं असतं. पण हळूहळू त्या कामातील रस नाहीसा होतो आणि मग ती रात्रीचा दिवस करून बनवलेली स्वतःची ओळख बिनकामी वाटू लागते. आणि मग वाटते की आयुष्यात एक तरी अनोळखी जागा असावी, जिथे मी माझाच नसेन , जिथे मला कोणताही बंधन नसेल ना कोणतीही प्रतिष्ठा, अनोळखी दुनियेत मी पूर्णपणे एकटा असेन, मला हव्या असलेल्या एकांता  सोबत, ना कोणाचा राम राम असेल, ना वा! वा! म्हणून केलेलं कौतुक, तिथे फक्त अनोळखी जागा सोबत असेल. 

खरच मित्रांनो.. आपल्या दररोजच्या जीवनापासून दूर कुठेतरी जिथे मी स्वतः चाच नसेल अशी अनोळखी जागा असावी. आणि माझ्या आयुष्यात ती एक अनोळखी जागा होती. खूप छान दिवस होते ते, माझ्या स्वतःच्या ओळखी पासुनी मी दूर होतो, एका अनोळखी दुनियेत. मला मिळालेल्या नवीन लोकांसोबत खूप मज्जा येत होत. कधी मोठ्याने न बोलणारा मी अगदी मनसोक्तपणे बाहू फैलावून जोरजोरात ओरडत होतो.

अगदी पोरकटपने छोटे छोटे विनोद आणि त्यातून होणारा हास्यकल्लोळ, अगदी मनसोक्त आयुष्य जगत होतो, शब्द वेडी बंधनं नव्हती. सोसाट वाहणाऱ्या वाऱ्याप्रमाणे अवस्था होती माझी. अगदी बेधुंदपणे आयुष्य होतं परिसासारख. अनोळखी आयुष्य जगताना एक ओळखीची व्यक्ती आयुष्यात येते आणि पुन्हा अनोळखी जागा ओळखीची होते. मग काय पुन्हा तीच बंधण. तेच स्वतःच्या ओळखीचे धडे. मान, मर्यादा आणि मग काय ती अनोळखी जागा आहे की होती आणि एकच सुंदर ओळ राहते. "एक अनोळखी जागा होती".
   
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News