सहकारमंत्र्यांसोबत कधीच विसंवाद नव्हता 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019
  • सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यापार वाढावा यासाठी आपण प्रयत्न करणार

सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व माझ्यात कधीच विसंवाद नव्हता. मिडियानेच हे वातावरण निर्माण केले असल्याचा आरोप पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यापार वाढावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती समितीचे सभापती व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. 

केंद्र व राज्य सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा राष्ट्रीय बाजार करू पहात आहे. सरकार ज्या वेळी एखादे विधेयक आणते त्यावेळी त्याचा अभ्यास करूनच विधेयक आणते. राष्ट्रीय बाजारच्या माध्यमातून जर शेतकरी आणि व्यापारी यांचे हित साधले जात असेल तर आम्ही या निर्णयाचे स्वागतच करू अशी भूमिकाही पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी मांडली.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News