अजुनही जागा आहे माणसातला माणूस...

दिव्येश जाधव, खर्डी
Friday, 6 September 2019

खर्डी : ३ ऑगस्ट रोजी मुंबई परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वे यंत्रणा विस्कळीत झालेली होती. मुंबई अमृतसर एक्सप्रेस, रात्री CSTM (सी.एस.टी.एम) हुन साडे अकराला सुटण्याऐवजी रात्री 2 वाजता सुटली. सकाळी 5 वाजेपासून मुंबईपासून जवळपास 100 किमी अंतरावर कसाऱ्याजवळील खर्डी स्टेशनवर उभी होती. या गाडी सोबतच भुवनेश्वर जाणारी कोणार्क एक्सप्रेस आणि मुंबई जाणारी पंजाब मेल पण खर्डी स्टेशनवर उभी आहे.

खर्डी : ३ ऑगस्ट रोजी मुंबई परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वे यंत्रणा विस्कळीत झालेली होती. मुंबई अमृतसर एक्सप्रेस, रात्री CSTM (सी.एस.टी.एम) हुन साडे अकराला सुटण्याऐवजी रात्री 2 वाजता सुटली. सकाळी 5 वाजेपासून मुंबईपासून जवळपास 100 किमी अंतरावर कसाऱ्याजवळील खर्डी स्टेशनवर उभी होती. या गाडी सोबतच भुवनेश्वर जाणारी कोणार्क एक्सप्रेस आणि मुंबई जाणारी पंजाब मेल पण खर्डी स्टेशनवर उभी आहे.

अतिवृष्टीमुळे गेल्या 8-9 तासापासून 3 रेल्वे गाड्या आणि त्यातील शेकडो प्रवासी एकाच ठिकाणी अडकलेले होते. पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. लहान स्टेशन असल्याने आणि रेल्वे मार्ग बंद असल्याने रेल्वे प्रशासन हतबल झालेले आहे. रेल्वे प्रशासन प्रवाशांना कुठलीच मदत करू शकत नव्हते पण अशातच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून खर्डीवासीयांनी सकाळी पाणी बॉटल, चहा, बिस्कीटे विनामूल्य वाटायला सुरुवात केली. खर्डीतील नागरिकांनी स्टेशनच्या जवळच मोठमोठ्या 5-6 पातेल्यात खिचडी शिजवून सर्व प्रवाशांच्या जेवणाची मोफत सोय केलेली होती. 

12 वाजेपासून गावातील तरुण तिन्ही गाड्यातील प्रत्येक बोगीत जाऊन लोकांना खिचडी खाण्यासाठी बोलावत होती. स्टेशनवर 2 ठिकाणी लोकांना पाणी आणि पत्रावळीत गरमागरम खिचडी वाटप करण्यात आली. कसलीही विचारपूस न करता मागेल त्याला चहा, पाणी बॉटल, बिस्किटे आणि खिचडी दिली जात होती. कुठल्याही राजकीय किंवा धार्मिक झेंड्याखाली एकत्र न येता निव्वळ माणुसकीच्या नात्याने अडचणीत सापडलेल्या 3 - 4 हजार लोकांना पाणी बॉटल, चहा, बिस्किटे आणि खिचडीचे वाटप विनामूल्य करत सर्व धर्मीय खर्डीवासीयांनी माणुसकीचे दर्शन घडविले.

दरवर्षी ह्या भागात अतिवृष्टी होते, रेल्वे गाड्या खर्डीला अडकतात आणि अशा वेळेस खर्डीतील गावकरी प्रवाशांच्या मदतीला धावून येतात. खर्डी गावातील लोकांनी सारे भारतीय माझे बांधव आहेत या आपल्या प्रतिज्ञेतील एका वाक्याची आठवण ठेवून बंधुभाव जपत खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. या संपूर्ण घटनेचा देखावा प्रतिकृती स्वरूपात न्यूअष्टविनायक मंडळखर्डी या आमच्या मंडळाने साकारण्याचा प्रयत्न केला आहे. 

मंडळाचे अध्यक्ष - प्रथमेश मनोरे, उपाध्यक्ष - प्रितम परदेशी, सदस्य- मनोज दुरगुडे, स्वरूप तुपे , संतोष चौहान , आविनाश कांबळे, मनोज परदेशी या सर्वांनी गेली 6 दिवस दिवस-रात्र काम करत हा देखावा साकारला आहे. शहापूर तालुक्याचे आमदार सन्माननीय श्री.पांडुरंग बरोरा व खर्डीचे पोलिस पाटील श्री. शामबाबा परदेशी यांनी मंडळाला भेट दिली. माणुसकी व एकतेचे दर्शन घडविणारा देखावा साकारल्या बद्दल मंडळातील सदस्यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News