मग त्यांना म्हतार कसं म्हणणार

रवी खापरे
Wednesday, 7 August 2019
  • मुलांकडून, नातवंडांकडून नवीन तंत्रज्ञान समजावून घेतात, त्यांना ‘म्हातारं’ कसं म्हणणार? ही मंडळी फक्त ‘ज्येष्ठ’ होत जातात, म्हातारे कधीच होणार नाहीत.

पिकत गेलेली मंडळी वेगळी दिसतात. त्यांना पुढच्या पिढीला खूप काही सांगायचं असतं आणि ऐकूनही घ्यायचं असतं. जे पिकत न जाता नुसतेच म्हातारे होतात, ते संध्याकाळी एकत्र बसून केवळ कुटाळक्या करतात.

‘म्हातारपण’ ही मला कायम मनाची अवस्था वाटते. उद्याकडे आनंदाने बघणं, उत्सुकतेने बघणं म्हणजे ‘तारुण्य’ आणि उद्याचा दिवस उजाडला नाही तरी चालेल असं वाटणं म्हणजे ‘म्हातारपण’ इतकी सोपी व्याख्या होऊ शकेल का? विशीतली-तिशीतली कितीतरी मंडळी इतकी कंटाळलेली दिसतात, चेहऱ्यावर संपूर्णपणे ‘कंटाळा’ आणि कश्याविषयीच उत्सुकता नाही, कसलाही शोध घेण्याची वृत्ती नाही. मग ह्याला कशाला ‘जिवंत’ आणि ‘तरुण’ म्हणायचं? ह्याउलट सत्तरीतले कितीतरी आज्जी-आजोबा रोज ज्या उत्साहाने नवीन नवीन गोष्टी अंगीकारतात. मुलांकडून, नातवंडांकडून नवीन तंत्रज्ञान समजावून घेतात, त्यांना ‘म्हातारं’ कसं म्हणणार? ही मंडळी फक्त ‘ज्येष्ठ’ होत जातात, म्हातारे कधीच होणार नाहीत. सुधीर मोघे अगदी शेवटपर्यंत पुढच्या अनेक योजना आखण्यात मग्न होते, उद्याकडे हसून पाहत होते. ही मंडळी ‘ज्येष्ठ’ झाली. त्यांच्या आयुष्याची ‘उजवण’ झाली.

तिकडून एक म्हातारा आला, म्हातारा म्हणजे नुसताच म्हातारा… पिकत-बिकत गेलेला नाही.’ किती नेमकं लिहिलंय हे.पिकत गेलेलं एखादं जोडपं जेव्हा संध्याकाळी बागेत बाकावर शांत बसतं, तेव्हा त्यांच्यात शब्दांविना एक संवाद चालू असलेला मला कायम जाणवतो आणि बोरकरांची ‘आता विसाव्याचे क्षण’ ही कविता आठवते.

"आता विसाव्याचे क्षण, माझे सोनियाचे मणी
सुखे गोवीत-ओवीत, त्याची ओढीतो स्मरणी"

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News