...म्हणून अभिनेता अशोक सराफला "मामा" म्हणतात 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

मुंबई : अभिनेता अशोक सराफ म्हणजे मराठीमधील विनोदाचा बादशाहच..! त्यांच्या विनोदाचे किस्से आपण सर्वानीच ऐकले आहेत. सुरुवातीपासूनच अशोक सराफ यांना मराठी इंडस्ट्रीतील सर्व "मामा" म्हणून हाक मारतात. मात्र त्यांना हे नाव पडले कसे? याबाबत देखील एक रंजक गोष्ट आहे.

एका मुलाखतीदरम्यान अशोक सराफ यांनी "मामा" नावामागील गोष्ट सांगितली. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रकाश शिंदे नावाचा एक कॅमेरामॅन होता. प्रकाश रोज सेटवर आपल्या लहान मुलीला घेऊन येत असे. सेटवरील काम करणाऱ्या लोकांची ओळख करून घेण्यात तिला रस असे.

शूटिंग झाल्यानंतर ती माझ्याकडे बोट दाखवून हे कोण म्हणून तिच्या वडिलांना म्हणजेच प्रकाशला विचारायची. त्यावेळी प्रकाश म्हणायचा, हे अशोक सर आहेत, पण तू त्यांना "अशोक मामा" असं म्हणत जा. त्यानंतर ती मला "अशोक मामा" म्हणू लागली. हळूहळू तिच्या बोलण्याप्रमाणे सेटवर सर्वचजण अशोक मामा म्हणून बोलवू लागले. अशाप्रद्धतीने अशोक यांना "मामा" नाव पडले. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News