माझी धन्नो... हक्काची...

आरुशी अद्वैत
Thursday, 1 August 2019

30 जुलै 2007 माझी साथीदार माझ्या घरी आली आजही तिची साथ आहे. स्वतःच्या पैशाने फुल्ल कॅश payment करून विकत घेतलेली गाडी बंगलोरला. घरी आली आणि डोळे भरून आले. हळद, कुंकू, फुलं वाहून पूजा केली आणि तिच्याबरोबर आयुष्याने वेग घेतला.

वेळ काळ, ऊन, पाऊस, थंडी, वारा कसलीही पर्वा न करता मला जिथे जायचं आहे तिथे मला नेणारी माझी धन्नो. आज 12 वर्षांची झाली. एक तप झालं ती मूकपणे माझी साथ देत आहे, विना तक्रार. ऑफिसला जाणं असो किंवा लेकीला शाळेत सोडणं असो, तिने नेहमीच सुहास्य वदनाने आमचे स्वागतच केले. आमच्यासाठी 1 लाख किलोमीटर धावली, पण अजून थकली नाहीये.

त्याच जोशाने कार्यरत आहे. माझ्या काळजाचा तुकडा आहे. परवा 30 जुलै ला लेकीचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला, पण माझी धन्नो मात्र रोजच्या सारखीच पावसापाण्यात उभी होती, माझी वाट पाहात. काल सकाळी तिला पाहिलं आणि पुन्हा डोळ्यात पाणी आलं, अजूनही थांबलेलं नाही.

निर्जीव वस्तू, पण किती लळा लावला आहे तिने. माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे हे ती वेळोवेळी सिद्ध करते, कुठल्याही कामाचं क्रेडिट न घेता ती आहे, म्हणून मी आयुष्यात बऱ्याच गोष्टी करू शकत आहे, कारण तिच्यामुळे जो वेळ वाचतो, त्यात मी माझी अनेक कामे उरकू शकते आणि आवश्यक गोष्टींना वेळ देऊ शकते, ह्यात शंका नाही.

माझ्या मते, आई वडील, आणि भावानंतर माझ्या आयुष्यात इतकी वर्षे साथ देणारी ही एकमेव आहे. ती आहे म्हणून मी आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. माझी धन्नो, माझी आहे, अगदी हक्काची.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News