होम गार्ड भरतीने फसवलं म्हणून तरुणांनी रस्त्यातचं सगळ्यांना अडवलं

 रसिका जाधव
Thursday, 20 June 2019

आज पोलीस आयुक्तालय क्रीडा संकुलात पुरुष व महिला या दोघांसाठी होमगार्डची भरती होणार होती. याठिकाणी भरतीसाठी तरुण मुले व मुली आले होते.

ठाणे - आज पोलीस आयुक्तालय क्रीडा संकुलात पुरुष व महिला या दोघांसाठी होमगार्डची भरती होणार होती. याठिकाणी भरतीसाठी तरुण मुले व मुली आले होते. जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, धुळे, कोल्हापूर या जिह्यातील तरुण कावपासून येथे आले होते. काही तरुण- तरुणींनी कालची रात्र रेल्वे स्टेशनवर काढली. सकाळी 6 वाजता मैदानावर पोहोचले, कारण भरतीची वेळ सकाळी 7 ते 11 अशी वेळ होता. 

 

ही भरती (ता. 21, 22) या दोन दिवसांनी ही भरती होती, पण सकाळी 7 वाजले तरी भरती सुरु झाली नाही, मात्र 7:30 वाजता ठाणे पोलीसांनी सांगीतले की भरती रद्द करण्यात आली आहे. तरुणांनी भरती रद्द करण्याचे कारण विचारले असता, कोणतेच कारण पोलिसांनी न सांगितल्याने तरुणांमधमध्ये संतापाचे वारावरण निर्माण झाले होते. भरतीसाठी आलेल्या सर्व तरुणांनी रस्ता रोको केला, त्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. 

अखेर ज्यांनी भरतीच लेटर तयार केलं होतं त्यांनी स्वतः येऊन सांगतील की भरतीसाठी आता मैदान योग्य नाही, त्यामुळे ही भरती आता रद्द करुन सप्टेंबर महिन्यात होणार आहे. पहिल्यांदा किंवा दुसऱ्या आठवड्यात होईल आणि ही भरती फक्त ठाणे जिल्ह्यातील तरुणांसाठी आहे. संजय कुमार पाटील
     

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News