शाळा प्रवेशोत्सवाच्या दिवशीच विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019

तालुक्‍यामध्ये सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील एकूण विद्यार्थीसंख्या २३ हजार २७० आहे.

मंठा - उन्हाळ्याच्या दीर्घ सुटीनंतर सोमवारी  मंठा तालुक्‍यातील शाळा सुरू होणार असून शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, अनुदानित खासगी शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या प्रत्येक शाळेमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार असून शाळेच्या प्रवेशद्वारावर रांगोळी; तसेच आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार आहे; तसेच पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्यास मोफत पुस्तक वाटप करणार असल्याची माहिती गटसमन्वयक के. जी. राठोड यांनी दिली आहे. 

तालुक्‍यामध्ये सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील एकूण विद्यार्थीसंख्या २३ हजार २७० आहे. त्यात इयत्ता पहिली २३९२, इयत्ता दुसरी २३९२, इयत्ता तिसरी २३९२, इयत्ता चौथी २५४३, इयत्ता पाचवी २५६०, इयत्ता सहावी २५३७, इयत्ता सातवी २५९२, इयत्ता आठवी २४९१ अशा एकूण एकूण १९,८९९ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित होणार आहेत. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी जिल्हास्तरीय अधिकारी तालुक्‍यातील विविध शाळांना भेट देणार आहेत, अशी माहिती के. जी. राठोड यांनी दिली आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News