"त्यो असता तं गंज उड्या मारल्या असत्या"- काकासाहेब शिंदेंच्या आईची भावना

अतुल पाटील
Friday, 28 June 2019

"काकासाहेब समाजाच्या कामात कायम पुढं असायचा. त्यो असता तं गंज उड्या मारल्या असत्या. तेला कितिका आनंद झाला असता." या भावना आहेत मराठा आरक्षणासाठी हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या आई म्हणजेच मीराबाई शिंदे यांच्या.

"काकासाहेब समाजाच्या कामात कायम पुढं असायचा. त्यो असता तं गंज उड्या मारल्या असत्या. तेला कितिका आनंद झाला असता." या भावना आहेत मराठा आरक्षणासाठी हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या आई म्हणजेच मीराबाई शिंदे यांच्या.

औरंगाबादेत २०१६ मध्ये निघालेल्या मराठा क्रांती मुक मोर्चापासून काकासाहेब प्रत्येक आंदोलनात हिरिरीने सहभागी व्हायचे. त्यानंतर सरकारने ठोस भूमिका न घेतल्याने तब्बल दोन वर्षांनी म्हणजेच जुलै २०१८ मध्ये इशारा देऊन कायगाव टोका (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील पुलावरुन गोदावरी नदीत उडी घेतली. यानंतर मराठा समाजातील ४२ जणांनी जीवन संपवले होते. 

काकासाहेबांना जाऊन वर्ष व्हायच्या आतच राज्य सरकारने दिलेले आरक्षण वैध ठरल्याने जल्लोष होत आहे. यावेळी काकासाहेबांच्या आईंच्या भावना 'सकाळ'ने जाणून घेतल्या आहेत. त्या म्हणाल्या, "मराठा क्रांती मोर्चा सुरु झाल्यापासून तो नेहमी पुढं असायचा. समाजासाठी तो कायपण करायला तयार असायचा. 

पहिला तो त्यालाच महत्व द्यायचा. काकासाहेब गेल्याचे दु:ख आहेच, पण त्याचा ज्याच्यासाठी जीव गेला, ते मिळाल्याचा आनंद आहे. "काकासाहेबांचा भाऊ अविनाशने न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे. समाजाने १६ टक्के आरक्षणाची मागणी केली होती. त्या तुलनेत १२-१३ टक्के आरक्षण कमीच आहे. १६ टक्केसाठी संघर्ष करावा लागेल. आधीच दोन पिढ्या बरबाद झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयातही राज्य सरकारने आरक्षण टिकवण्यासोबत, टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. काकासाहेबांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News