दहावीची प्रश्‍नपत्रिका यंदापासून बदलणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 4 July 2019
  • शिक्षण खात्याचा निर्णय; आकलनशक्‍तीवर भर, भविष्यकालीन शिक्षणाचाही विचार 

बेळगाव -  शिक्षण खात्याने तब्बल दहा वर्षांनंतर दहावी वार्षिक परीक्षा प्रश्‍नपत्रिकेच्या स्वरूपात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती शाळांना देण्यात आली आहे. नव्या स्वरूपात विद्यार्थ्यांच्या आकलनशक्‍तीवर भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात उपयोगी ठरतील अशाप्रकारे प्रश्‍नपत्रिका तयार करण्यात येणार आहेत. तसेच एक व दोन गुणांच्या प्रश्‍नांची संख्या कमी करण्यात आली आहे.

२०१९-२० च्या प्रश्‍नपत्रिकेत कोणत्या प्रकारचे बदल असतील याबाबत शिक्षण खात्याने बुधवारी (ता. ३) अध्यादेश जारी केला आहे. नव्या प्रश्‍नपत्रिकेत सज्ञानात्मक प्रश्‍न प्राधान्याने असतील. गद्य, पद्यासह इतर वाचनावर आधारित प्रश्‍नांची संख्या अधिक असेल. तीन गुणांचे प्रश्‍न कमी करुन चार व पाच गुणांचे प्रश्‍न जास्त असतील. प्रथम भाषा विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत चार 

दहावीची प्रश्‍नपत्रिका यंदापासून बदलणार
गुण सामान्यज्ञानावर आधारीत असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतर माहिती घेणे आवश्‍यक ठरणार आहे. दहावीनंतर बारावी आणि इतर अभ्यासक्रमांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांना लाभदायक ठरेल अशा प्रकारे प्रश्‍नपत्रिका तयार केली जाणार आहे. स्मरण २१ टक्‍के, उपाययोजना ३६ टक्‍के, लेखन कौशल्य ३९ टक्‍के, रसग्रहण ४ टक्‍के अशा प्रकारे अंकाची विभागणी करण्यात आली आहे. नवीन प्रश्‍नपत्रिकेबाबत शिक्षकांना लवकरच मार्गदर्शन करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News