‘तेनाली रामा’चे गौरवास्पद ५०० एपिसोड्‌स पूर्ण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

सर्वांनी आपापली भूमिका मनापासून साकारली आहे आणि प्रत्येक भागाचे संपादन हा खूपच खास अनुभव आहे.

सोनी सब चॅनेलवरील ‘तेनाली रामा’ या मालिकेने गौरवास्पद ५०० एपिसोड्‌स पूर्ण करून आपल्या दर्शकांची मने जिंकली आहेत. ही मालिका आपल्या सुरुवातीपासूनच तेनालीरामाच्या जीवनातील ऐतिहासिक कथा समोर घेऊन आली.

ही मालिका अनेकांच्या पसंतीत उतरली आहे. सुप्रिसद्ध तेलुगू कवी तेनाली रामावर आधारित या मालिकेत पंडित रामाकृष्णन आपली बुद्धिमत्ता व चातुर्याच्या जोरावर आलेल्या कठीण समस्या सोडवतो.

तेनालीरामाची प्रमुख भूमिका साकारणारे कृष्णा भारद्वाज म्हणाले, ‘आम्ही सर्वांनी आपापली भूमिका मनापासून साकारली आहे आणि प्रत्येक भागाचे संपादन हा खूपच खास अनुभव आहे. या मालिकेच्या यशाचे श्रेय सर्व कलाकार व सदस्यांच्या उत्कृष्ट कामगिरीला जाते, ज्यांनी या कार्यक्रमाला इथपर्यंत पोहोचवले. दर्शकांचे मनोरंजन करत राहावे यासाठी ते अथक मेहनत घेत आहेत.’

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News