तेलंगणा पोलिसांनी चोरट्याला घेतले ताब्यात; इकडे मित्राने दिली अपहरण झाल्याची फिर्याद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 16 October 2019
  • सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दत्त चौक परिसरातून अमोल यास तेलंगाना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि तेथून थेट शहर गुन्हे शाखेच्या जेलरोड येथील कार्यालयात नेले.

सोलापूर: तेलंगणा पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात सोलापुरातील तरुणास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या मित्राने अज्ञात व्यक्तीने आपल्या मित्राचे अपहरण केले आहे, अशी फिर्याद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दिली. अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी दुपारनंतर नेमके कारण स्पष्ट झाले. 

अमोल दगडू जाधव (वय 23, रा. सलगर वस्ती, डोणगाव रोड, सोलापूर) असे तेलंगणा पोलिसांनी घरफोडीच्या गुण्यात ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दत्त चौक परिसरातून अमोल यास तेलंगाना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि तेथून थेट शहर गुन्हे शाखेच्या जेलरोड येथील कार्यालयात नेले. इकडे अमोलच्या कुटूंबीयांनी त्याची शोधाशोध केली. तो कोठेच सापडत नसल्याने अज्ञात व्यक्तीने त्याचे वाहनातून अपहरण केले आहे, अशी फिर्याद मित्र वसंत हातागळे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली. 

अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याचे शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना कळाले. त्यानंतर चौकशीसाठी सोलापुरात आलेल्या तेलंगणा पोलिसांनी अमोल यास ताब्यात घेतल्याचे फौजदार चावडी पोलिसांना कळविले. त्यानंतर अमोलचे अपहरण झाले नाही तर त्याला पोलिसांनी अद्याप घेतले आहे हे स्पष्ट झाले, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांनी दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News