तेजश्री प्रधान नव्या मालिकेतून पुन्हा सुनेच्या भूमिकेत

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Thursday, 4 July 2019
  • तेजश्रीच्या चाहत्यांसाठी खुशखबर असुन, ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार. 
     

म्ंबई : अभिनेत्री तेजश्री प्रधानने 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून सर्वच प्रेक्षकांची मने जिंकली होती. महाराष्ट्रात घराघरात लाडकी सुन व लेक म्हणुन तिला ओळखल जात होत. चित्रपटात आणि नाटकात काम करत असल्यामुळे काही कालावधीसाठी तिने छोट्या पडद्याला रामराम ठोकला होता. मात्र तेजश्रीच्या चाहत्यांसाठी खुशखबर असुन, ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

माझ्या प्रिय रसिक मायबाप प्रेक्षका...I received , still receiving.. so many msgs on my , "अगबाई सासूबाई " story And it is really difficult for me to acknowledge each and every msg as they tooooooooo many( and from last evening also the networks are not really supporting). But I read them all and m speechless and m totally overwhelmed by ur love and concern  I just want to assure each one of you that "मला तुमच्या प्रेमाची जाणीव तेव्हाही होती ..आजही आहे आणि कायम राहील... आणि ही कृतज्ञता माझ्या कामातून तुमच्या पर्यंत पोहोचत रहील"... #HaapyMe #HappyLife

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan) on

अखेर ३ वर्षांच्या ब्रेकनंतर ही लाडकी अभिनेत्री पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे आणि ते पण एक सून म्हणूनच 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून तेजश्री पुन्हा एकदा घराघरात दिसणार आहे. या मालिकेत ती एका सुनेच्या मुख्य भुमिकेत झळकणार आहे. तेजश्री सोबतच या मालिकेत निवेदिता सराफ, रवी पटवर्धन आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि या प्रोमोमुळे प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढल्याचं दिसुन येत आहे. तेजश्रीने नुकतचं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत तेजश्रीने असं म्हटलं आहे की, "मला तुमच्या प्रेमाची जाणीव तेव्हाही होती... आजही आहे आणि कायम राहील... आणि ही कृतज्ञता माझ्या कामातून तुमच्यापर्यंत पोहोचत राहील…"     

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News