महाराष्ट्राने कधीही पाहिलं नसेल, इतकं मताधिक्य आदित्य ठाकरेंना मिळेल - तेजस ठाकरे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 14 October 2019

वरळी मतदारसंघात मोठा भाऊ आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी तेजस ठाकरे मैदानात उतरले. महाराष्ट्राने कधीही पाहिलं नसेल, इतकं मताधिक्य आदित्य ठाकरेंना मिळेल, असा विश्वास यावेळी तेजस ठाकरे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला.

मुंबई : वरळी मतदारसंघात मोठा भाऊ आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी तेजस ठाकरे मैदानात उतरले. महाराष्ट्राने कधीही पाहिलं नसेल, इतकं मताधिक्य आदित्य ठाकरेंना मिळेल, असा विश्वास यावेळी तेजस ठाकरे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला.

राजकारणापासून दूर राहिलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यंदाच्या निवडणुकीत सभांच्या व्यासपीठावर दिसत आहेत. माझ्या शुभेच्छा आदित्य ठाकरे यांच्यासोबत आहेत. सर्व उमेदवारांच्या सोबत आहेत. २४ तारखेला अख्खा महाराष्ट्र भगवा होणार, असं तेजस ठाकरे म्हणाले.

१२४ जागांपैकी किती जागांवर विजय मिळेल? असा प्रश्न विचारला असता 124 वगैरे काही नाही. शिवसेना-भाजपची महायुती आहे. त्यामुळे अख्खा महाराष्ट्र भगवा होणार, महाराष्ट्राने कधी पाहिलं नसेल इतकं मताधिक्य आदित्य ठाकरेंना मिळेल, असा विश्वास तेजस यांनी व्यक्त केला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News