शुल्लक वादातून युवकाची हत्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

चंद्रपूर: क्षुल्लक वादातून लालपेठ येथील संजय झुनमुलवार (वय ३६) या युवकाची हत्या केली. या घटनेत एक जण जखमी झाला. याप्रकरणात चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. काही आरोपी स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाले.

चंद्रपूर: क्षुल्लक वादातून लालपेठ येथील संजय झुनमुलवार (वय ३६) या युवकाची हत्या केली. या घटनेत एक जण जखमी झाला. याप्रकरणात चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. काही आरोपी स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाले.

आरोपींम मध्ये एका महिलेचा समावेश आहे. तत्पूर्वी यापरिसरातील नागरिकांना त्यांना बेदम मारहाण केली. संजय झुनमुलवार आणि आरोपी हे लालपेठ कॉलरी येथील रहिवासी आहे. त्यांच्यात मेत्री होती. या घटनेतील जखमी युवक आणि आरोपी यांच्यात वाद होता. सोमवारला रात्री त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. हा प्रकार संजयला माहित झाला. त्यांनी समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण आरोपींनी रागाच्या भरात वाद असलेल्या युवकासह संजयवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

मात्र उपचाराचा आधीच संजयचा मुत्यू झाला होता. दुस-यावर उपचार सुरू आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांच्या हाती काही आरोपी लागले. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. काही स्वतः:हून पोलिसांच्या स्वाधीन झाल्याची माहिती आहे. शिवा उङ्र्क गोलू, रामा  कोठा, लक्ष्‘ण कोठा  आणि रामा कोठाच्या यांच्या पत्नीचा आरोपींत  समावे आहे. या चारही जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News