धक्कादायक! शिखर धवन नंतर 'या' दोन खेळाडूंना दुखापत; टीम इंडियाची चिंता वाढली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 June 2019

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात भारतीय संघ फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत असताना भारतीय संघाला दुखापतीचं ग्रहण लागलंय. सलामीवीर फलंदाज शिखर धवनला दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर जावं लागले. आता अजून एक चिंता वाढवणारी माहिती समोर येत असून वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि अष्टपैलू खेळाडू विजय शंकरच्या पायालाही दुखापत झाल्याची बातमी येत आहे.

लंडन : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात भारतीय संघ फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत असताना भारतीय संघाला दुखापतीचं ग्रहण लागलंय. सलामीवीर फलंदाज शिखर धवनला दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर जावं लागले. आता अजून एक चिंता वाढवणारी माहिती समोर येत असून वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि अष्टपैलू खेळाडू विजय शंकरच्या पायालाही दुखापत झाल्याची बातमी येत आहे. याबाबत अजून संघ व्यवस्थापनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी टीम इंडियाची चिंता मात्र वाढली आहे.

विजय शंकर नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत होता. याचवेळी गोलंदाज जसप्रीत बुमराचा यॉर्कर चेंडू त्याच्या पायावर लागला. यानंतर विजय शंकरला प्रचंड वेदना झाल्या आणि तो माघारी परतला. दरम्यान, पीटीआयला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही दुखापत फार गंभीर नाही.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भुवीच्या पायाचे स्नायू दुखावल्यामुळे त्याला गोलंदाजी करता आली नाही. पुढचे आठ दिवस तो खेळू शकणार नाही. विजय शंकरने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली होती. या सामन्यात पहिलीच विकेट विजय शंकरने मिळवून दिली होती. त्यामुळेच त्याच्या दुखापतीविषयी चिंता वाढली आहे.

भारतीय संघाचा पुढील सामना 22 तारखेला अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी रिषभ पंतचा संघात समावेश करण्यात आलाय. तर भुवीवर फिजिओंच्या देखरेखीत आहे. विजय शंकरला दुखापतीमुळे सरावही करता आला नाही. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याच्या खेळण्यावर सस्पेन्स आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News