'टीम सीएमओ'ने फडणवीसांचा वाढदिवस केला वेगळ्या पद्धतीने साजरा !

सकाळ (यिनबझ)
Monday, 22 July 2019

देवेंद्र फडणवीस वाढदिवस साजरा करत नाहीत पण आज मात्र वर्षावर त्यांनी रोपटे लावले.

मुंबई :  देवेंद्र फडणवीस वाढदिवस साजरा करत नाहीत पण आज मात्र वर्षावर त्यांनी रोपटे लावले.

वृक्षारोपणाची विनंती मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव भूषण गगराणी  यांनी केली अन या पदावर काम केलेले आता म्हाडाचे उपाध्यक्ष असणारे सनदी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी आग्रह धरला. व्यक्‍तीगत समारंभाला फाटा देण्यावर फडणवीस ठाम होते पण वृक्षारोपण मात्र पर्यावरणपूरक असल्याने त्यांनी झाड लावले. 

वाढदिवसाला हारतुरे नकोत ,ही रक्‍कम मुख्यमंत्री निधीला दया अशी विनंती त्यांनी केली होती.त्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीत जमा केले. सुमारे 20 अधिकारी कर्मचारी मुख्यमंत्री कार्यालयात काम करतात.त्यांनी निधीला दिलेले योगदान फडणवीस यांना सुखावून गेले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News