हे आहेत टॅटू काढण्याचे परिणाम

सुयोग घाटगे
Friday, 25 January 2019

गोंदण्याचे आधुनिक रूप म्हणजे टॅटू. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील युवापीढीमध्ये हे टॅटूचे लोण पसरत आहे. केशरचना आणि फॅशनेबल कपडे याच पद्धतीने आता टॅटू देखील व्यक्तिमत्व आणि सौंदर्य  खुलवण्यामध्ये प्रमुख भूमिका बजावत आहे. पूर्वी गोंदणे काढले जायचे ते देखील प्रथेनुसार. आता मात्र अधिक चांगल्या साधन सामुग्रीने हे टॅटू काढले जातात आणि ते देखील आकर्षक रंगसंगतीमध्ये...! खास करून युवा पिढीमध्ये टॅटूची क्रेझ प्रचंड आहे.

गोंदण्याचे आधुनिक रूप म्हणजे टॅटू. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील युवापीढीमध्ये हे टॅटूचे लोण पसरत आहे. केशरचना आणि फॅशनेबल कपडे याच पद्धतीने आता टॅटू देखील व्यक्तिमत्व आणि सौंदर्य  खुलवण्यामध्ये प्रमुख भूमिका बजावत आहे. पूर्वी गोंदणे काढले जायचे ते देखील प्रथेनुसार. आता मात्र अधिक चांगल्या साधन सामुग्रीने हे टॅटू काढले जातात आणि ते देखील आकर्षक रंगसंगतीमध्ये...! खास करून युवा पिढीमध्ये टॅटूची क्रेझ प्रचंड आहे. कोणताही टॅटू काढण्यापेक्षा आपल्या व्यक्तिमत्त्वाशी-व्यवसायाशी निगडित टॅटू काढण्याचा ट्रेंड सध्या जास्त प्रचलित आहे. अनेकदा प्रेरणादायी टॅटू काढला जातो. काही तरुण-तरुणी केवळ अनुकरण करण्यासाठी टॅटू अंगावर काढतात. पण काही युवक-युवती त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भर पडेल असे टॅटू अंगावर काढतात. काहीजण आपल्या आयुष्याशी निगडित घटनांशी टॅटू काढतात. कोल्हापूर मध्ये मुलींचे टॅटू काढण्याचे प्रमाण देखील अधिक आहे.   

   एकदा शरीरावर टॅटू काढला तर तो कायमस्वरूपी शरीरावर राहातो. त्यामुळे टॅटू काढताना अतिशय कल्पकतेने काढण्याची गरज आहे. कारण आज काढलेला टॅटू काही वर्षांनी जुना होईल. जुना टॅटू नको असल्यास एक तर प्लास्टिक सर्जरीचा करावी लागते  किंवा लेजर ट्रीटमेंट घ्यावी लागते.  जुन्या टॅटूला लपवण्यासाठीही नवीन टॅटू काढण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. आठवडाभर अंगावर राहाणारे तात्पुरते टॅटूही काढता येतात. पण बहुतांश युवा कायमस्वरूपी टॅटू काढून घेतात. मंडेला, बँड टॅटू, पोर्ट्रेट, थ्री-डी, लेटरिंग हे काही ट्रेंडिंग टॅटू पॅटर्न आहेत.   

काय घ्याल काळजी?    

 टॅटू काढताना व काढल्यावर खूप काळजी घ्यावी लागते. टॅटू सुईच्या मदतीने काढला जातो. टॅटूसाठी वापरण्यात येणारी सुई विशिष्ट प्रकाराच्या शाई व रंगात बुडवून शरीरावर कोरले जाते. सुईला लागलेल्या शाईने शरीरावर चित्र कोरायचे.  एखाद्याच्या शरीरावर टॅटू काढण्यासाठी वापरलेली सुई व रंगाची शाई दुसऱ्याच्या शरीरावर वापरली तर संसर्गाचा धोका असतो. टॅटू काढताना त्वचेतून रक्त येते. एखाद्याला रक्ताशी संबंधित आजार असेल तर त्याचा संसर्ग दुसऱ्याला होऊ शकतो. त्यामुळे  प्रत्येक वेळेस नवीन सुई व रंग वापरले जातात.  टॅटू काढताना शरीरावर वेदनाही होतात कारण मशिनच्या सहाय्याने  शरीरावर फिरत असते. टॅटूची शाई त्वचेच्या दुसऱ्या ते तिसऱ्या थरापर्यंत जाऊन पोहोचते. टॅटू काढल्यावर त्वचेला वेदना होत असल्याने काहींना सौम्य स्वरूपाची वेदनाशामक औषधेही घ्यावी लागतात. टॅटू काढल्यावर १५ दिवस त्या भागाला पाणी, साबण लावायचा नाही. व्यायाम करायचा नाही, मुख्य म्हणजे टॅटू काढल्यावर किमान सहा महिन्यांसाठी रक्तदान करता येत नाही कारण टॅटूचा रंग त्वचेच्या तिसऱ्या थरापर्यंत पोहोचतो. अनेकदा रक्तात रंग मिसळलेला असते. त्यामुळे रक्तदान न करण्याचा सल्ला दिला जातो. 

असे आहेत दर

टॅटू आर्टिस्ट हे प्रत्येकी इंचावर टॅटूचे पैसे आकारतात. तर काही आर्टिस्ट टॅटू काढण्यासाठी किती वेळ लागतो (पर सिटिंग) त्याच्यावर दर आकारतात. टॅटूचे नक्षीकाम बारीक किंवा चित्र खूप मोठे असल्यास एका दिवसात चित्र पूर्ण होत नाही. काही तासांसाठी सलग दोन दिवसही बसावे लागते. त्यामुळे टॅटूचे दर जास्त आकारले जातात. टॅटू आर्टिस्टची कोणतीही संघटना नाही. त्यामुळे टॅटूचे दर निश्चित झालेले नाहीत. टॅटू आर्टिस्ट त्याच्या कौशल्यावर आणि या क्षेत्रातील अनुभव व ज्येष्ठतेनुसार दर आकारतो. साधारण ४०० ते ७०० रुपये प्रत्येक इंच असा दर आहे.    

हे लक्षात असू द्या 

  फॅशन म्हणून टॅटू काढताना त्याचे तोटेही युवा पिढीने लक्षात ठेवण्याची गरज आहे.  टॅटू असणाऱ्याला नोकरी न मिळण्याची शक्यता आहे. शरीराच्या दर्शनी भागात टॅटू असेल तर भारतीय संरक्षण दलात नोकरी मिळत नाही. 

   हे एक च्यालेंजींग करियर आहे. येथे चुकीला थारा नाही. प्रत्येकाच्या आवडी निवडीनुसार टॅटू हवे असतात. हे समजावून घेऊन प्रत्यक्षात उतरवावं लागत हे आव्हानात्मक आहे. 

                                                            - पंकज शिवाजी पाटील ( टॅटू आर्टिस्ट, साई टॅटू पार्लर ) 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News