‘आँखे २’मध्ये तारा सुतारिया?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019

दिग्दर्शक अनीस बज्मी यांच्या ‘आँखे २’ या चित्रपटात तारा भूमिका साकारणार आहे.

अभिनेत्री तारा सुतारिया सध्या ‘मरजावां’ आणि ‘आरएक्‍स १००’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असतानाच, ती एका नवीन चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे.

दिग्दर्शक अनीस बज्मी यांच्या ‘आँखे २’ या चित्रपटात तारा भूमिका साकारणार आहे. तारा नुकतीच अनीस यांना भेटली होती आणि तेव्हापासून ती भेट कास्टिंगसाठी झाल्याची चर्चा रंगू लागली.

हा चित्रपट मल्टिस्टारर असल्याने याआधी या चित्रपटासाठी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, अभिनेता सैफ अली खान, विकी कौशल, अमिताभ बच्चन अशा बऱ्याच कलाकारांच्या नावांची चर्चा होती.

हा चित्रपट ‘आँखे’ या चित्रपटाचा सिक्वेल असणार आहे. आता या मल्टिस्टारर चित्रपटात ताराला संधी मिळते का, याची उत्सुकता आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News