कॅनडामध्ये शिक्षण घ्या, हे होतील फायदे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019

इतर देशांच्या तुलनेत कमी खर्च 
कॅनडातील विद्यापीठांची फी तुलनेने अमेरिका किंवा युरोपपेक्षा कमी आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत (१ अमेरिकन डॉलर = ७० रुपये) किंवा युरोच्या (१ युरो = ७८ रुपये) तुलनेत कॅनेडियन डॉलर स्वस्त आहे. (१ कॅनेडियन डॉलर = ५३ रुपये) 

इतर देशांच्या तुलनेत कमी खर्च 
कॅनडातील विद्यापीठांची फी तुलनेने अमेरिका किंवा युरोपपेक्षा कमी आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत (१ अमेरिकन डॉलर = ७० रुपये) किंवा युरोच्या (१ युरो = ७८ रुपये) तुलनेत कॅनेडियन डॉलर स्वस्त आहे. (१ कॅनेडियन डॉलर = ५३ रुपये) 

आर्थिक मदत 
शिक्षण घेताना प्रत्येक विद्यार्थ्याला २० तास कॅम्पसमध्येच नोकरी करता येते. लायब्ररी, कॉम्प्यूटर लॅब, दुकाने, फूड मॉल्स इत्यादी ठिकाणी नोकऱ्या करता येतात. कॅम्पस जॉबमध्ये साधारणतः तासाला ११ डॉलर म्हणजेच महिन्याला सुमारे ८०० ते ९०० डॉलर मिळतात. त्यातून राहण्याचा आणि जेवण्याचा खर्च भागू शकतो. शिवाय समर आणि विंटर ब्रेकमध्ये बाहेर पूर्णवेळ नोकरी करता येते. त्यामुळे ट्यूशनचा बराचसा खर्च निघू शकतो.

 नोकरीच्या भरपूर संधी 
कॅनेडियन विद्यापीठांचा अभ्यासक्रम हा उद्योग जगतातल्या मागणीप्रमाणे तयार केलेला असल्याने सुमारे ९० टक्के विद्यार्थ्यांना शिक्षण संपल्यावर ६ महिन्यांत नोकरी लागते. बहुसंख्य विद्यापीठात कॅम्पस फेअरमध्ये त्या देशातल्या चांगल्या कंपन्या भाग घेतात. कॅनडात सध्या बेरोजगाराचे प्रमाण फक्त ५.२० टक्के इतके कमी आहे. शिवाय तिथे तरुणांची संख्या दिवसेंदिवस कमी होते आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. 
 

शिक्षणानंतर कायमच्या वास्तव्यासंदर्भातील (इमिग्रेशनचे) सोपे कायदे 
शिक्षण संपल्यावर पोस्ट ग्रॅज्युएट वर्क परमीट मिळते आणि कॅनडात ३ वर्ष नोकरी करायची परवानगी मिळते. यासाठी अमेरिकेप्रमाणे कॅनडात वार्षिक कोटा नसतो. ज्यांना काम करण्याची इच्छा असेल त्या सर्वांना ‘वर्क परमीट’ मिळते. दरम्यानच्या काळात तुम्ही कायम वास्तव्यासाठी अर्ज करू शकता. आणि ६ ते १० महिन्यांमध्ये तो मंजूर होतो.

कॅनडात शिक्षण घेण्याचे फायदे
कॅनडामध्ये विविध देशांतील, विविध संस्कृती आणि भाषा बोलणारे लोक स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन व्यापक होतो. ओंटेरिओ आणि ब्रिटिश कोलंबिया या दोन राज्यांत पुष्कळ भारतीय लोकही राहतात. विद्यापीठात विविध देशातील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमही सतत होत असतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News