फुगे घ्या फुगे नैसर्गिक फुगे

योगेश चिकने
Monday, 22 July 2019
  • शेताच्या अथवा माळाच्या कुंपणाला (आगरी शब्द - वयीला ) ही झाडे हमखास सापडतात. झाडाच्या पाळ्याच्या देठात एवढा चिक असतो की देठ मोडला आणि त्यात फुंकर मारली की त्यातून असंख्य फुगे बाहेर पडतात. आणि पहायला मिळतात आपल्याला शेकडो नैसर्गिक फुगे.

फुगे म्हणजे लहान मुलांचे जीव की प्राण, अनेक प्रकारचे आपण कृत्रिम फुगे बघतो,पण कधी नैसर्गिक फुगे बघितले आहेत का तुम्ही ?

हो! आम्ही बघितले आहेत. आमच्या ग्रामीण भागात पुर्वजांपासुन एक गंमत म्हणून एका वृक्षाच्या पाळ्याच्या देठापासून फुगे काढले जातात. त्यास आमच्या ग्रामीण व आगरी भाषेत "जेफाल" असे म्हणतात.

शेताच्या अथवा माळाच्या कुंपणाला (आगरी शब्द - वयीला ) ही झाडे हमखास सापडतात. झाडाच्या पाळ्याच्या देठात एवढा चिक असतो की देठ मोडला आणि त्यात फुंकर मारली की त्यातून असंख्य फुगे बाहेर पडतात. आणि पहायला मिळतात आपल्याला शेकडो नैसर्गिक फुगे.

यात्रेतील कृत्रिम आणि खर्चीक फुग्यांपासून फुकट आणि सहज मिळणाऱ्या या फुग्यांमागेलहान मुले तर अगदी वेडीपिसी होतात, या फुग्यांना पकडायला तुंबड जमते. अशी ही आगळी वेगळी मजा आम्ही तर लहानपणी खुप अनुभवली आहेत. आता छोट्या मुलांना ते करताना पाहून आनंद होतो. तुम्ही ग्रामीण भागात राहात असाल तर तुम्ही पण ही मजा अनुभवली असावी. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News