‘भूलभुलैय्या २’मधुन तब्बू लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Friday, 15 November 2019

कार्तिक-कियारासोबत तब्बू पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे. तिची भूमिका मात्र गुलदस्त्यात आहे. हा चित्रपट २००७ मध्ये आलेल्या ‘भूलभुलैय्या’ चित्रपटाचा सिक्वेल आहे.

दिग्दर्शक अनीज बज्मी यांच्या आगामी ‘भूलभुलैय्या २’ चित्रपटाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे काही दिवसांपूर्वीच समोर आले. आता या चित्रपटात अभिनेत्री तब्बूही झळकणार आहे.

या चित्रपटात कार्तिक-कियारासोबत तब्बू पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे. तिची भूमिका मात्र गुलदस्त्यात आहे. हा चित्रपट २००७ मध्ये आलेल्या ‘भूलभुलैय्या’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. तब्बूच्या ‘अंधाधुन’, ‘दे दे प्यार दे’ सारख्या चित्रपटातील तिच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली. त्याचबरोबर ती सध्या ‘जवानी जानेमन’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News