‘फिकल इन्कॉन्टिनन्स’ ची लक्षणे!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 June 2019

रुग्णाला लघवी किंवा शौचावर नियंत्रण ठेवता न येण्याचा त्रास म्हणजे ‘फिकल इन्कॉन्टिनन्स’.

‘इन्कॉन्टिनन्स’चा त्रास हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो

ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात आढळतो.

रुग्णाला लघवी किंवा शौचावर नियंत्रण ठेवता न येण्याचा त्रास म्हणजे ‘फिकल इन्कॉन्टिनन्स’. आरोग्याशी संबंधित काही कारणांमुळे किंवा अन्य आजारांसाठी घेतलेल्या औषधांमुळे शौचाशी संबंधित त्रास रुग्णांना होतो.‘इन्कॉन्टिनन्स’चा त्रास हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात आढळतो. तसेच पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये या त्रासाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे असा त्रास असल्यास डॉक्‍टरांकडे जाऊन सल्ला व उपचार घेतले पाहिजे.

आजार का होतो?

  • मेंदू व पाठीच्या कण्यासह (नर्व्हस सिस्टिम) गुदद्वाराच्या आजूबाजूला असलेले स्नायू व अवयवांच्या कार्यावर प्रतिकूल परिणाम झाल्यास इन्कॉन्टिनन्सचा त्रास उद्‌भवतो.
  • अयोग्य आहार
    कर्करोगावरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या काही रेडिएशन्समुळे.
  • मधुमेह आणि अर्धांगवायूसारख्या  मेंदूविकारांमुळे.
    अनेकवेळा झालेल्या बाळंतपणाच्या शस्त्रक्रियांमुळे.  मूळव्याध व भगेंद्रवरील उपचारासाठी पारंपरिक पेरीॲनल शस्त्रक्रिया झाल्यामुळे. 

 लक्षणे व उपचार

  •  लघवी, शौचावरील नियंत्रण सुटणे
      बद्धकोष्ठता.
  •  शस्त्रक्रिया न करता बायोफिडबॅक व पेल्विक फ्लोर फिजिओथेरपीच्या माध्यमातून उपचार शक्‍य.
  •  शस्त्रक्रिया करायची झाल्यास मॅग्नेटिक स्फिंक्‍टर, स्फिंक्‍टर रिपेअर आणि महिलांसाठी पीओपीएस शस्त्रक्रियेचा पर्याय उपलब्ध. 
  •   स्नायूंमधील दाब तपासण्यासाठी मॅनोमेट्री चाचणी करता येते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News