सुश्मिता सेनच्या घरी आली नवी "पाहुणी"

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 June 2019

सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन नुकताच लग्नबंधनात अडकला. अभिनेत्री चारू असोपा हिच्यासोबत बंगाली पद्धतीने त्याने लग्नगाठ बांधली. गोव्यात थाटामाटात पार पडलेल्या या विवाह सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन नुकताच लग्नबंधनात अडकला. अभिनेत्री चारू असोपा हिच्यासोबत बंगाली पद्धतीने त्याने लग्नगाठ बांधली. गोव्यात थाटामाटात पार पडलेल्या या विवाह सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. लग्नानंतर आता नववधूच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओत सुश्मिता सेनची आई नव्या सुनेचे स्वागत करताना दिसतेय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by neelam asopa (@neelam_asopa) on

१६ जूनला राजीवने गर्लफ्रेंड चारू असोपाशी लग्न केले. गोव्यात झालेल्या या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये अतिशय जवळचे लोक व मित्रमंडळी तेवढे उपस्थित होते. सुश्मिताने या लग्नाच्या विधींचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. भावाच्या लग्नात सुश्मिताने दोन मुली आणि बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल यांच्यासोबत प्रचंड धम्माल केली.  रोहमन शॉलसोबत तिने खास रोमँटिक डान्स केला. 

 

राजीव आणि चारू यांच्या साखरपुड्याची अंगठी दाखवणारा  एक व्हिडीओही तिने शेअर केला. याशिवाय मुलींसोबत ‘चुनरी डान्स’चा व्हिडीओही सुश्मिताने पोस्ट केला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@rohmanshawl #standbyme

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

राजीव व चारू गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करत होते. चारू ही टेलिव्हिजनची एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. २००९ मध्ये ‘अगल जनम मोहे बिटिया ही कीजो’ या मालिकेतून तिने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. ‘मेरे अंगने में’ आणि ‘जीजी मां’ या मालिकांमुळे ती लोकप्रिय झाली. सध्या ती ‘विक्रम बेताल’ या मालिकेत काम करतेय.

२०१६ मध्ये चारूने नीरज मालवीयसोबत साखरपुडा केला होता.  ‘मेरे अंगने में’ या मालिकेत चारू व नीरज यांनी बहीण-भावाची भूमिका साकारली होती. या सेटवर दोघांत प्रेम झाले आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्याआधीच हे नाते तुटले. नीरजसोबत ब्रेकअप झाल्यानंतर चारूच्या आयुष्यात राजीवची एन्ट्री झाली. राजीव हा पेशाने मॉडेल आहे. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News