सुषमा यांनी प्रेमासाठीही केले होते मोठे धाडस..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 7 August 2019
  • कॉलेजच्या दिवसांत बहरलं प्रेम
  • प्रथम सुषमा यांना घरून खूप विरोध झाला

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी (ता. 6) रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. त्या 67 वर्षांच्या होत्या. त्या जितक्या करारी होत्या तितकीच आदर्श अशी त्यांची प्रेमकहाणी होती. 

ज्या काळात महिलांना पुरेसे स्वातंत्र्य नव्हते, आपला नवऱ्याकडे नजर वर करून बघायची हिंमत नव्हती अशा काळात सुषमा यांनी प्रेमविवाह केला. घरच्यांच्या विरोधाला तोंड देत त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. 13 जुलै 1975 मध्ये त्यांनी वकिल स्वराज कौशल यांच्याशी विवाह केला.

सुषमा व स्वराज कौशल यांची भेट चंढीगडमधील लॉ कॉलेजमध्ये झाली. तिथूनच त्यांचे प्रेम फुलण्यास सुरवात झाली. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रथम सुषमा यांना घरून खूप विरोध झाला. त्यांना आपल्या घरच्यांची समजूत घालावी लागली. बऱ्याच प्रयत्नांनी सुषमा यांनी आपल्या घरच्यांची समजूत काढून विवाहास परवानगी मिळवली आनंदाने विवाहबद्ध झाल्या.

सुषमा यांचे पती स्वराज हे सर्वोच्च न्यायलयात प्रतिष्ठित वकील आहेत. स्वराज यांना वयाच्या 34 व्या वर्षी अॅडव्हॉकेट जनरल पदावर नियुक्त करण्यात आले होते. ते सर्वात कमी वयाचे अॅडव्हॉकेट जनरल ठरले. तर वयाच्या 37 व्या वर्षी ते मिझोरमचे राज्यपाल झाले. त्यांनी 1990 ते 1993 या तीन वर्षांसाठी राज्यपाल पद भूषवले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News