निधनापूर्वी सुषमांनी केला होता फोन अन् म्हणाल्या...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 7 August 2019
  • स्वराज यांनी निधनाच्या काही मिनिटे आधीच आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांचा खटला लढणारे ज्येष्ठ वकिल हरिश साळवे यांच्याशी संपर्क साधला होता.
  • त्यांचे ते बोलणे अखेरचे ठरेल याची कल्पनाही नसलेले साळवे ही आठवण सांगताना भावूक झाल्याचे पहायला मिळाले.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्यासाठी लढणारे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांची एक रुपया फी घेऊन जाण्यासाठी सुषमा स्वराज यांनी निधनापूर्वी त्यांना फोन केल्याचे समोर आले आहे. आज (बुधवार) साळवेंना त्यांनी एक रुपया घेऊन जाण्यासाठी घरी बोलाविले होते. 

स्वराज यांनी निधनाच्या काही मिनिटे आधीच आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांचा खटला लढणारे ज्येष्ठ वकिल हरिश साळवे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांचे ते बोलणे अखेरचे ठरेल याची कल्पनाही नसलेले साळवे ही आठवण सांगताना भावूक झाल्याचे पहायला मिळाले. आज (बुधवारी) त्यांनी त्यांच्या खटल्याची फी घेऊन जाण्यास सांगितले होते. कुलभूषण जाधव खटल्यात हरीश साळवे यांनी केवळ 1 रूपया फी घेऊन तो खटला लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार स्वराज यांनी साळवे यांना त्यांची फी देण्यासाठी संपर्क केला होता.

साळवे म्हणाले, की आज 8 वाजून 50 मिनिटांनी त्यांच्याशी बोलणं झाले आणि त्यानंतर काही वेळातच त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मी सुन्न झालो. उद्या संध्याकाळी 6 वाजता तुम्ही तुमची फी घ्यायला या, असेही त्यांनी सांगितले होते. सध्या काय बोलावे हे सुचत नाही. त्या एक ज्येष्ठ मंत्री होत्या. त्यांच्या निधनाने मी माझी मोठी बहिण गमावली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News