राम मंदिर वादावर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, 2 ऑगस्टपासून दररोज होणार सुनावणी

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Thursday, 18 July 2019
  • सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

  • 2 ऑगस्टपासून अयोध्याप्रकरणी दररोज सुनावणी

नवी दिल्ली -  राम मंदिर आणि बाबरी वादावर सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. गुरुवारी मध्यस्थता कमीटीचे रिपोर्ट पाहिल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या संवैधानिक बेंचच्या मध्यस्थता कमिटीला 31 जुलैपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. २ ऑगस्टपासून अयोध्याप्रकरणी दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

 

 ५ न्यायाधीशांचं खंडपीठ सुनावणी करणार असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. अयोध्या आणि बाबरी वाद प्रकरणात मध्यस्थांच्या समितीने ३१ जुलैपर्यंत अहवाल द्यावा असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. हा अहवाल दिल्यानंतर २ ऑगस्टपासून दररोज सुनावणीला सुरुवात होईल असेही कोर्टाने म्हटले आहे. याआधी मध्यस्थांच्या समितीला अहवाल सादर करण्यासाठी १८ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ती वाढवून ३१ जुलै करण्यात आली आहे. मध्यसस्थांच्या समितीकडून काय तोडगा निघतो तेेदेखील पाहू असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News