#supermom दोन मुलांच्या 47 वर्षीय भारतीय आईने पटकावली 4 सुवर्ण पदके!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 20 July 2019

वयाची 40शी ओलांडली की माणुस उतरत्या वयात लागतो. काही प्रमाणात शरिरावर साईड ईफेक्ट दिसू लागतात. काहींच्या मते आयुष्याची उतरी कळा इथूनच सुरू होत असते, मात्र अशा एक सुपर मॉम आहे, ज्यांना दोन किशोरवयीन मुलं आहेत आणि वय 47 वर्ष त्यांनी देशासाठी तब्बल 4 सुवर्ण पदके मिळवून दिली आहेत, तेही पावरलिफ्टिंग या खेळ प्रकारात.

पुण्याच्या भावना टोकेकर या 47 वर्षीय महिलेने ओपन एशियन चॅम्पियनशिपमधील पावरलिफ्टिंगमध्ये (Open Asian Championships held in Chelyabinsk, Russia) 4 सुवर्ण पदकांची कमाई करत देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.

वयाच्या चाळीसाव्या वर्षी म्हणजेच मागील सात वर्षांपूर्वी त्वचेच्या आजारासाठी घेतलेल्या औषधांमुळे साईड इफेक्ट झाले होते, ते घालवण्यासाठी भावना यांनी जीम जॉईंट केली. त्यांनी घरी बसून राहण्यापेक्षा जीम जाणेच पसंत केले आणि मिळालेल्या प्रोत्साहनातून AWPC/WPC या ओपन एशियन पावरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी आज देशाला घवघवीत यश मिळवून दिले. 

Week 1@ day 1........... #momof2at47 #fitnessfreakmum #fitcouplegoals

A post shared by Bhavana Bhave Tokekar (@bhavnatokekar) on

भावना टोकेकर यांनी या वयात घवघवीत यश मिळवून देशाचं नाव रोषन केलं आहेच, मात्र त्याहीपेक्षा मनात न्यूनगंड बाळगणाऱ्या महिलांसाठीदेखील ही अभिमानाची गोष्ट आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News