'सुपर थर्टी' खास "या" लोकांसाठी

प्रविण एम. पाईकराव
Wednesday, 24 July 2019
  • काहीही झाले तरी आपले पालक आपल्या पाठीशी आहे हे जेव्हा त्या मुलांना कळेल तेव्हा ती यशाची उतुंग शिखरे पादाक्रांत करतील. मुलांचे पालक नाही तर त्यांचे मित्र, मैत्रीण व्हायची खरी गरज आहे असे मला वाटते.

खुप दिवसांनी सिनेमा बघायला गेलो ते ही खास मुलांच्या आग्रहस्तव. मी आधीचं आनंद कुमार यांच्या विषयी वाचले होते. त्यांच्या अफाट कर्तुत्वाला मनापासून सलाम. परंतू म्हणतात ना लेखन साहित्य पेक्षाही सिनेमानी त्यांचे कर्तुत्व जगाला दिसले.

खरचं सर्व विध्यार्थी, शिक्षक आणी प्राध्यापक मित्रांनी हा सिनेमा तर पाहावाच पण प्रत्येक पालकांनी ही पहावा. ते या साठी पालक म्हणुन आपली ही भुमिका कुठे तरी कमी पड्तेय हे मला उमगले. अजुन ही खरी बुद्धिमत्ता खेडे गावात असुन ही खुप विध्यार्थी अश्या शिक्षणासाठी वंचित आहे आणि शिकवणी वर्गाच्या नावाखाली अक्षरशा बाजार सुरु आहे.

तर शहरी भागांमध्ये आज मुलांना चांगली शाळा, कॉलेज, शिकवणी, पैसा ह्या गोस्टी दिल्या की आपली जबाबदारी संपत नाही तर मुलांना हवे असलेला वेळ, प्रेम, आत्मविश्वास देने ही आपली खरी जबाबदारी आहे.

त्यांच्या भावना जपुन आपण त्यांच्या पाठीशी आहोत हा विश्वास त्यानां पाहिजे असतो. काहीही झाले तरी आपले पालक आपल्या पाठीशी आहे हे जेव्हा त्या मुलांना कळेल तेव्हा ती यशाची उतुंग शिखरे पादाक्रांत करतील. मुलांचे पालक नाही तर त्यांचे मित्र, मैत्रीण व्हायची खरी गरज आहे असे मला वाटते.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News