सनी लवकरच एका विनोदी भयपटात झळकणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019

बॉलीवूडची बेबी डॉल अभिनेत्री सनी लिओनी लवकरच एका विनोदी भयपटात झळकणार आहे. ‘कोका कोला’ असे या चित्रपटाचे नाव आहे.

बॉलीवूडची बेबी डॉल अभिनेत्री सनी लिओनी लवकरच एका विनोदी भयपटात झळकणार आहे. ‘कोका कोला’ असे या चित्रपटाचे नाव आहे.

त्यासाठी ती यूपीच्या हिंदी बोली भाषेचे धडे घेत आहे. ‘एखादी गोष्ट जेव्हा माझ्या कामाशी संबंधित असते, तेव्हा त्यासाठी मी सर्व नवीन गोष्टी शिकण्यास तयार असते. नवीन गोष्टी शिकायला मला आवडते आणि मजाही येते. आता मी यूपीची भाषा शिकते आहे आणि ही भाषा शिकताना मला मजा येत आहे,’ असे सनी सांगते.

हा चित्रपट उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक प्रसाद टटीकेनी हे चित्रपटाचे दिग्दर्शन करतील; तर महेंद्र धारिवाला आणि परमदीप संधू हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News