#SunilGavaskar बापाने केलेला पराक्रम आता मुलगा साकारणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 10 July 2019

पहिली ते आंग्ल भाषेतून पदवी आणि अर्धवट राहिलेले पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष असे शिक्षण घेताना जीवन जगण्याचे जे काही धडे पाठ्यपुस्तकामुळे शिकता आले त्यातील काही आजही आठवतात. महान फुटबॉलपटू पेले यांनी माराकाना स्टेडियमवर मुसळधार पावसात नोंदविलेला कारकिर्दीतील हजारावा गोल, वेस्ट इंडिजमध्ये दाढेत बर्फाचा तुकडा अडकून अशक्य वेदना होत असतानाही सुनील गावसकर यांनी ठोकलेले शतक, ब्रिटीश शिकारी जीम कॉर्बेट यांनी नरभक्षक वाघाची केलेली शिकार, आनंद यादव यांचा पाटी आणि पोळी हा धडा असे धडे आजही लक्षात आहेत. 

पहिली ते आंग्ल भाषेतून पदवी आणि अर्धवट राहिलेले पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष असे शिक्षण घेताना जीवन जगण्याचे जे काही धडे पाठ्यपुस्तकामुळे शिकता आले त्यातील काही आजही आठवतात. महान फुटबॉलपटू पेले यांनी माराकाना स्टेडियमवर मुसळधार पावसात नोंदविलेला कारकिर्दीतील हजारावा गोल, वेस्ट इंडिजमध्ये दाढेत बर्फाचा तुकडा अडकून अशक्य वेदना होत असतानाही सुनील गावसकर यांनी ठोकलेले शतक, ब्रिटीश शिकारी जीम कॉर्बेट यांनी नरभक्षक वाघाची केलेली शिकार, आनंद यादव यांचा पाटी आणि पोळी हा धडा असे धडे आजही लक्षात आहेत. 

आयुष्यात अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना पहिले ते साडेपंधरावी या कालावधीत कोणत्या इयत्तेत कोणता धडा शिकला, शाळेत की कॉलेजात हे आठवणे (वि)स्मरणशक्तीला झेपणारे नाही, पण पेले-सुनील गावसकर-जीम कॉर्बेट अशी नावे काय चीज असतात आणि ती कशामुळे अशी बनतात हे तेव्हाच्या बाल-किशोर-कुमार-तरुण अशा अवस्था पार करताना प्रेरणादायी ठरायचे.

 

यातील सुनील गावसकरचा आज 70वा वाढदिवस आहे. माझा जन्म फेब्रुवारी 1971चा, तर गावसकरचे कसोटी पदार्पण मार्च 1971 मधले. हा काही बादरायण संबंध जोडण्याचा प्रयत्न नाही. संदर्भ अशासाठी की गावसकरची कारकिर्द जशी बहरत गेली तशी सत्तरीच्या दशकात प्रारंभी जन्मलेली पिढी प्रेरीत होत गेली. त्यामुळे गावसकर हे घराघरात-मनामनात पोचलेले नाव आहे. अशावेळी सत्तरीत पदार्पण केलेल्या सनी भाई यांचा गावसकर असाच एकेरी उल्लेख करताना आधी त्यांची क्षमा मागतो.

गावसकरचा जन्म 1949चा म्हणजे अर्धशतकाला एक धाव कमी, पण पुढे याच गावसकरने सर्वाधिक शतकांचा डॉन ब्रॅडमन यांचा उच्चांक मोडला. गावसकरची ही कामगिरी किती थक्क करणारी आहे याची नव्याने मांडणी करूयात. ब्रॅडमनने जुलै 1948 मध्ये लिड््सला झालेल्या कसोटीत 173 धावांची नाबाद खेळी केली. कारकिर्दीतील ते त्यांचे 29वे शतक होते. 52 कसोटी व 80 डावांमधील त्यांची ही कामगिरी होती. ब्रॅडमन यांना इंग्लंडने सर हा किताब दिला. खरे तर इंग्लंड हे क्रिकेटचे जन्मदाते, पण त्यांना ब्रॅडमन घडविता आला नाही. ज्या ब्रॅडमन यांना इंग्लंडने सर किताब दिला त्यांचे रेकॉर्ड आपल्या गावसकरने सर केले.

1948 मधील हा उच्चांक 1983 मध्ये गावसकरने मोडला. 28 डिसेंबर 1983 रोजी चेन्नईतील एम. ए. चिदंबरम अर्थात चेपॉकवर गावसकरने वेस्ट इंडिजविरुद्ध सहाव्या कसोटी क्रिकेट सामन्यात कारकिर्दीतील 30वे शतक ठोकले. तेव्हा गावसकरने 425 चेंडूंना सामोरे जाताना 236 धावांची खेळी केली होती. त्या मालिकेत दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटीत 29वे शतक ठोकून ब्रॅडमनच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली होती.

ब्रॅडमन 1948च्या इंग्लंड दौऱ्यानंतर निवृत्त झाले. त्यानंतर इंग्लंडच नव्हे तर इतर देशांच्या अनेक दिग्गजांची कारकिर्द सुरु झाली आणि पार पडली. यातील कुणालाही ब्रॅडमन यांच्या आसपास जाता आले नाही. इंग्लंडच्या संदर्भात बोलायचे झाले तर जेफ्री बॉयकॉट यांची 1964 मध्ये सुरु होऊन 1982 मध्ये पार पडलेली कसोटी कारकिर्द 22 शतकांपर्यंतच मजल मारू शकली. ब्रॅडमन यांच्या बरोबरीने कारकिर्द घडविली असे लेन हटन 1937 ते 1955 दरम्यान 19 शतकेच काढू शकले. इंग्लंडचे आणखी एक नावाजलेले फलंदाज डेनिस कॉम्प्टन 1937 ते 1957 दरम्यान 17 शतके काढू शकले.

क्रिकेटचे बाप असलेल्यांना जे जमले नाही तो बाप पराक्रम आपल्या गावसकरने करून दाखविला. गावसकरने मग मापदंड इतका उंचावला की कसोटी कारकिर्दीत दहा हजार म्हणजे पाच आकडी धावांचा टप्पा पार करणारा तो पहिला फलंदाज बनला. तो दिवस सात मार्च 1987. पाकिस्तानविरुद्ध अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात  इजाझ फकीच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत गावसकरने हा उच्चांक गाठला.

गावसकरने वेस्ट इंडिजचा तेजतर्रार तोफखाना धडाडत असताना, वेस्ट इंडिज क्रिकेटचे सुवर्णयुग भरात असताना कारकिर्द घडविली. चार वेगवान वीरांचा त्याने हेल्मेट नव्हे तर नुसती स्कल कॅप घालून सामना केला. वामन मुर्ती असलेल्या गावसकरची स्टान्स, त्याची एकाग्रता, कॉपीबूक फटके खेळण्याची शैली हे मापदंड बनले.

त्यांचे Sunny Days हे पुस्तक क्रिकेटपटूंसाठी बायबल ठरले. तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या डेनिस लिली यांचे The Art of Fast Bowling हे पुस्तकही बेस्टसेलर होते. अर्थात ज्यांना वेगवान गोलंदाजी कशी खेळायची हे जाणून घ्यायचे असेल त्यांनी सनी डेज वाचावे. याचे कारण The Art of FACING Fast Bowling हे या पुस्तकाचे खरे नाव आहे.

तर असा हा आपला सुनील मनोहर गावसकर 

सिर्फ नाम ही काफी है अशा श्रेणीतील एक आद्य असा दिग्गज, त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. असा योग आणखी 30 वर्षे येवो अशाही सदिच्छा

Tags
सुनील गावसकरआनंद यादव

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News