‘पहलवान’चा फर्स्ट सॉंग रिलीज, सुनील शेट्टीचा समोर आला अनोखा लूक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 31 July 2019

सुनील शेट्टीच्या आगामी ‘पहलवान’ चित्रपटाकडे साऱ्यांचे लक्ष आहे. या चित्रपटात तो सुपरस्टार सुदीपबरोबर काम करत असून तब्बल पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ‘जय हो पहेलवान’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

मुंबई :  सुनील शेट्टीच्या आगामी ‘पहलवान’ चित्रपटाकडे साऱ्यांचे लक्ष आहे. या चित्रपटात तो सुपरस्टार सुदीपबरोबर काम करत असून तब्बल पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ‘जय हो पहेलवान’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. त्यानिमित्ताने सुनीलचा दमदार लूक प्रेक्षकांच्या समोर आला आहे.

या गाण्यामध्ये सुनील जवळपास पाचशे डान्सर्ससह थिरकताना दिसत आहे. कोरिओग्राफी गणेश आचार्यने केली आहे. बऱ्याच काळानंतर रुपेरी पडद्यावर मनसोक्त नृत्य करण्याची संधी मिळाल्याने सुनीलही फार खूश आहे. सुनील म्हणतो, ‘या चित्रपटाताली माझी भूमिका आणि लूक प्रेक्षकांना आवडत आहे. शिवाय बऱ्याच वर्षांनी मी चित्रपटामध्ये मनसोक्त डान्स केला आहे.’ हा चित्रपट येत्या १२ सप्टेंबरला चित्रपटगृहात दाखल होईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News