‘यिन’तर्फे नागपुरात १२, १३ जूनला समर यूथ समिट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

तरुणाईच्या शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासात हे ‘समिट’ मोलाची भूमिका बजावणार आहे.

नागपूर - डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क-‘यिन’ या व्यासपीठाच्या माध्यमातून  नागपूर, नाशिक, नगर, पुणे आणि औरंगाबाद येथे यिन समर यूथ समिट होणार आहे. बारावी, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १२ आणि १३ जूनला हे सलग दोन दिवसांचे शिबिर असेल. पुण्यातील यूथ समिट १७, १८ जूनला होईल.

तरुणाईच्या शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासात हे ‘समिट’ मोलाची भूमिका बजावणार आहे. यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या वतीने याचे आयोजन केले आहे. या वर्षीचे पहिले समिट कोल्हापूरला नुकतेच झाले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रातील अग्रगण्य स्पेक्‍ट्रम अकॅडमी (नाशिक) प्रस्तुत ही समिट असून, बारामती ॲग्रो लिमिटेड आणि स्मार्ट सिटी नागपूर यांच्या सहयोगाने ती होईल.

‘जेएसपीएम’ आणि माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान पुरस्कृत असणाऱ्या या समिटमध्ये सक्‍सेसफुल बिझनेस, टीम बिल्डिंग, युवा व राजकारण, सेलिब्रिटींशी संवाद, आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी संवाद अशी सत्रे होतील.
या समिटचे असोसिएट्‌स स्पॉन्सर पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पुणे), नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ (पुणे), सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्‌स (पुणे), सृजन कॉलेज ऑफ डिजाईन (पुणे) आणि रांका ज्वेलर्स (पुणे) आहेत. 

तरुणाईची व्याख्या म्हणजे जो विचाराने तरुण आहे, जो विश्वास ठेवून उद्याची स्वप्ने पाहतो तो तरुण. जाती, धर्म, भाषा अशा कित्येक भिंती तोडून सर्व तरुणांनी एकत्र यायला हवे. यासाठी ‘यिन समर यूथ समिट’ उत्तम व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी, तरुणांनी यातून मार्गदर्शन घ्यावे. 
- नंदा जिचकार, महापौर.

शिक्षणव्यवस्था नैतिक अधिष्ठान असणारी, सुसंस्कृत युवापिढी तयार करणारी आणि सामाजिक जाणिवा निर्माण करणारी आहे. या उद्दिष्टांची पूर्तता ‘यिन’च्या विविध उपक्रमांतून होत आहे. 
- आमदार तानाजी सावंत, 
संस्थापक सचिव ‘जेएसपीएम’, अध्यक्ष ‘टीएसएसएम’  

‘यिन’चे युवक-युवती संघटनशक्तीच्या जोरावर विकासात योगदान देत 
आहेत. यामुळे ‘सकाळ परिवारा’कडून देशाला खूप अपेक्षा राहतील. 
- डॉ. गिरीश देसाई, 
कार्यकारी संचालक, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट 

यूथ समिटमध्ये तरुणांना दिशा देण्यासाठी आयोजित मार्गदर्शन सत्रे मी स्वत: गेल्या वर्षी अनुभवली आहेत. अशा उपक्रमाची फार मोठी गरज आजच्या पिढीला आहे.  
-संतोष रासकर,  
संचालक, सृजन कॉलेज ऑफ डिझाइन, पुणे  

नवा भारत घडविण्याची क्षमता तरुणाईत आहे. बुद्धीच्या बळावर स्वतःचा विकास घडविताना देशासाठी आणि समाजासाठी तरुणांनी पुढे यावे यासाठीच ‘यिन’चे हे महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे.  
- वास्तुपाल रांका, संचालक, रांका ज्वेलर्स

आजचा युवक मुळातच बुद्धिमान आहे. मात्र, त्याच्यापुढे आव्हानेही मोठी असून स्पर्धेलाही तोंड द्यावे लागत असले तरी विविध क्षेत्रांत संधीही आहे. ‘यिन समर यूथ समिट’च्या निमित्ताने तरुणांना उत्तम मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. संधीचा उपयोग सकारात्मकरीत्या कसा करावा, या दृष्टीने हे समिट तरुणांसाठी उपयुक्त ठरेल. 
- डॉ. रामनाथ सोनवणे, 
सीईओ, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड. 

‘यिन समर यूथ समिट’ नागपूरकर तरुणांसाठी पर्वणी आहे. २१ व्या शतकातील युवकांनी विविध कला, गुण, मूल्यवर्धित शिक्षण आदी गुणांचा व्यावसायिकरीत्या वापर करून आर्थिक उन्नती साधली पाहिजे. या सर्व बाबींचा विचार करता ‘यिन समर यूथ समिट’च्या माध्यमातून नागपूरच्या तरुणांना नवा अनुभव मिळेल. 
-मोहन मते, 
माजी आमदार, अध्यक्ष, माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान, नागपूर. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News