नैराश्यातून मुलीची आत्महत्या

विलास शिंदे
Sunday, 9 June 2019

सेलू: इयत्ता दहावीच्या परीक्षेत नापास झाल्याने नैराश्यातून एका विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील चिकलठाणा (बु.) येथे शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. 

सेलू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिकलठाणा (बु.) येथील रहिवाशी सुरेखा बालासाहेब जाधव (वय१६) ही मुलगी गावात असलेल्या एका खाजगी शिक्षण संस्थेत इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. तिने मार्च महिन्यात झालेली दहावीची परिक्षा दिली होती. 

शनिवारी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होताच सुरेखाला नापास झाल्याचे समजले. तिने घरातील कीटक नाशक औषधी प्राशन केले. घरातील मंडळीनी तिला सेलू येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल केले. पंरतू उपचारा दरम्यान सुरेखाचा मृत्यू झाल्याचे पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांनी माहिती दिली. दरम्यान सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News