महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गळफास घेवून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ) 
Wednesday, 14 August 2019

सोलापूर: सोलापुरात शिकायला असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास न्यू पाच्छा पेठ येथील शारदा किड्‌स स्कूलच्या इमारतीमध्ये घडली. 

समर्थ श्रीशैल मसुती (वय 18, रा. समता नगर, स्टेशन रोड, अक्कलकोट) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. समर्थ हा सोलापुरातील महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होता. तो न्यू पाच्छा पेठेतील भाजी मंडई जवळील शारदा किड्‌स शाळेच्या इमारतीमध्ये मित्रांसमवेत खोली करून राहत होता. 

बुधवारी दुपारी सर्व मित्र महाविद्यालयात गेल्यानंतर समर्थ खोलीवर एकटाच होता. त्याने छताच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजले नाही. घटनेची माहिती मिळताच जेलरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. समर्थला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News