शाहरुखची मुलगी ‘या’ चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये एंट्री!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 8 August 2019

एका हिंदी वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार शाहरुख खानने एका मुलाखती सांगितले होते की, लवकरच सुहाना चित्रपटात काम करणार आहे. सध्या बॉलिवूडमध्ये स्टार सेलिब्रिटी आपापल्या मुलांना लॉन्च करण्यात व्यस्त आहेत.

एका हिंदी वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार शाहरुख खानने एका मुलाखती सांगितले होते की, लवकरच सुहाना चित्रपटात काम करणार आहे. सध्या बॉलिवूडमध्ये स्टार सेलिब्रिटी आपापल्या मुलांना लॉन्च करण्यात व्यस्त आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शारूखची मुलगी सुहानाच्या डेब्यूची चर्चा होत आहे. लंडनमध्ये अभिनयाचे शिक्षण घेत असलेल्या सुहानाने अनेक नाटकांमध्ये तिथं काम केले आहे.

गेल्यावर्षी सुहाना वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते. या फोटोशूटनंतर सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा रंगल्या होत्या. पण शाहरुखने या बातम्या धुडकावून लावल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच सुहाना खानने एका शॉर्ट फिल्मचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. या शॉर्ट फिल्म मधून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. शेअर केलेल्या पोस्टरवर सुहानाच्या फोटोसोबत The Grey Part Of Blue असे लिहिले दिसते.<

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#thegreypartofblue art by @olsdavis

A post shared by Theo Gimeno (@theodoregimeno) on

>

सुहानाच्या लॉन्चिंगसाठी शाहरूखने भन्साळींच्या नावाला पसंती दिली होती, याचे कारण भन्साळी त्यांच्या भव्यदिव्य चित्रपटांसाठी ओळखले जातात. भन्साळींसारख्या लार्जर दॅन लाईफ दिग्दर्शकाशिवाय बॉलिवूडमध्ये अन्य दुसरा पर्याय नाही. कुण्या बड्या दिग्दर्शकाने सुहानाला लॉन्च करावे, ही शाहरूखची इ्च्छा होती. मध्यंतरी संजय लीला भन्साळी सुहानाला लॉन्च करणार, अशी बातमी होती.

आपण काहीतरी वेगळे करावे असे सुहानाला वाटते. तसेच सुहानाला पारंपरिक लव्हस्टोरीत इंटरेस्ट नाही. आपला डेब्यू काहीतरी वेगळा आणि यादगार व्हावा, अशी तिची इच्छा आहे. आता तिची ही इच्छा भन्साळी पूर्ण करतात की अजून कुणी, हे लवकरच कळेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News