सुदीप किच्चा ‘दबंग ३’चा व्हिलन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 9 October 2019

सुदीप ‘बल्ली’ नावाच्या व्हिलनची भूमिका साकारत आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि अरबाज खानही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.

सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता ‘दबंग’च्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमानने ‘दबंग’ मध्ये साकारलेला चुलबुल पांडे प्रसिद्ध तर आहेच; पण या चित्रपटातील आणखी एक चेहरा समोर आला आहे. अभिनेता सुदीप किच्चा या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेत झळकणार आहे.

 सलमानने सोशल मीडियावरून सुदीपचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. यामध्ये सुदीप ‘बल्ली’ नावाच्या व्हिलनची भूमिका साकारत आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि अरबाज खानही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमानने सोशल मीडियावर ‘चुलबुल पांडे’ नावाने अकाऊंट उघडले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News