अधिकाऱयांच्या बैठकीत प्रेझेंटेशन करताना अचानक पॉर्न व्हिडिओ सुरू 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

जयपूर : राजस्थान सरकारच्या अधिकाऱयांची बैठक सुरू असताना पॉवर प्रेझेंटेशन सुरू असताना अचानक पॉर्न व्हिडिओ सुरू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. 

जयपूर : राजस्थान सरकारच्या अधिकाऱयांची बैठक सुरू असताना पॉवर प्रेझेंटेशन सुरू असताना अचानक पॉर्न व्हिडिओ सुरू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. 

अन्न पुरवठा विभागातील मुख्य सचिव मुग्धा सिन्हा यांनी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी स्क्रीनवर पॉवर प्रेझेंटेशन दाखवले जात होते. स्क्रीनवर अचानक पॉर्न व्हिडिओ सुरू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. 15 सेकंद व्हिडिओ सुरू होता. अधिकाऱयांच्या बैठकीदरम्यान पॉर्न व्हिडिओ सुरू झाल्यामुळे काही वेळासाठी बैठक थांबविण्यात आली होती. सरकारी अधिकाऱयांच्या बैठकीदरम्यान पॉर्न व्हिडिओ कसा सुरू झाला, याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

'एक अधिकारी आपल्या लॅपटॉपवरून प्रेझेंटेशन दाखवत असताना अचानक व्हिडिओ पॉपअप झाला. व्हिडिओवर क्‍लिक झाल्यामुळे तो प्ले झाला. स्क्रीनवर व्हिडिओ दिसू लागल्यामुळे अधिकारी गोंधळून गेला. अखेर 15 सेकंदानंतर व्हिडिओ बंद करण्यात आला,' अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News