असा राजा होणे नाही, पाहा कारणही तसेच होते

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 June 2019

गरिब जनतेवर प्रेम करणारे, प्रजेवर माया करणारे, प्रचंड देहाचे, मोठ्या मनाचे, जातपात न मानणारे, उद्योगांना चालना देणारे, कुस्तीची आवड असणारे, कलेला आश्रय देणारे, शिक्षणाचा पुरस्कार करणारे महाराज म्हणजे श्रीमंत शाहू.

पायात हजारो, लाखोंची लक्ष्मी लोळण घेत असताना हजारो-लाखो दिनदलितांचा उध्दार करण्याचा ध्यास मनी बाळगणारे लोकनेता म्हणजे राजर्षी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज.

कोल्हापूर संस्थान हा शब्द जरी ओठावर आला, तर सगळ्यात आधी आठवण होते, ती म्हणजे श्रीमंत शाहू महाराज यांची. कोल्हापूरच्या मातीत ‘मल्लविद्या’ रुजविण्याचे, जोपासण्याचे व वाढविण्याचे काम महाराजांनी हाती घेतले आणि ‘कुस्तीची पंढरी’ म्हणून कोल्हापूरची नवी ओळख करून दिली. 1895 साली याच ‘कुस्तीच्या पंढरीत’ मोतीबाग तालीमीची स्थापना केली आणि हजारो मल्लांना स्वत:ची ओळख करुन देण्याची संधी दिली.

‘पहिली शरीरसंपत्ती दुसरी पूत्रसंपत्ती व तिसरी धनसंपत्ती असेल तोच पुण्यवान’ या महाराजांच्या त्रिसुत्री समिकरणावरून महाराजांना क्रिडा क्षेत्रात असलेली आवड समजून येते.

राजर्षी शाहु महाराजांना त्यांच्या 145 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...

जन्म 26 जून 1874 
मृत्यू 06 मे 1922

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News