उत्तराधिकारी कार्यकारिणीची बैठक ७ ऑगस्टनंतर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 2 August 2019
  • मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी कार्यकारिणीची दिली माहिती
  • संसदेच्या अधिवेशनाचा समारोप 7 ऑगस्टला होणार

नवी दिल्ली ः काँग्रेसची कार्यकारिणी बैठक पुढील आठवड्यात संसद अधिवेशन समाप्तीनंतर होणार आहे. या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधींचा उत्तराधिकारी कोण असेल, याचा निर्णय होऊ शकतो.

संसदेच्या अधिवेशनाचा समारोप सात ऑगस्टला होणार आहे. त्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होईल, असे आज पक्षातर्फे जाहीर करण्यात आले. काँग्रेसच्या सर्व सरचिटणीसांची बैठक आज झाल्यानंतर मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी कार्यकारिणी बैठकीबाबतची माहिती दिली. , बैठकीचा अजेंडा आणि तारीख ठरलेली नाही. 

राहुल गांधींनी निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. कार्यकारिणीने राजीनामा फेटाळला असला, तरी राहुल गांधींनी निर्णयात बदल नाही, असे तीन जुलैच्या पत्राद्वारे स्पष्ट केले. यामुळे काँग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. राहुल यांच्या स्पष्टोक्तीनंतर काँग्रेसमध्ये नवा अध्यक्ष कोण असावा, याची चर्चा सुरू होऊन तरुण अध्यक्ष की हंगामी ज्येष्ठ अध्यक्ष, असे पर्यायही अनौपचारिकरीत्या पुढे आले. यामध्ये मुकुल वासनिक, सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापासून ते ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट यांच्यापर्यंत अशी नावेही चर्चेत आली. मिलिंद देवरा यांनीही राष्ट्रीय पातळीवर मोठी भूमिका बजाविण्यास तयार असल्याची जाहीर इच्छा व्यक्त केली होती. आता प्रियांका गांधींकडे अध्यक्षपद सोपवा, या मागणीने जोर धरला आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News