आरडीजी महाविद्यालयांमध्ये केवायसी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 2 August 2019
  • भारतीय सेवासदन चे अध्यक्ष दिलीपराज गोइंका आणि प्राचार्य डॉक्टर देवेंद्र व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली केवायसी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय सेवासदन चे अध्यक्ष दिलीपराज गोइंका आणि प्राचार्य डॉक्टर देवेंद्र व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली केवायसी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयाच्या उत्कृष्ट उपक्रमांतर्गत दरवर्षी बीए प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीसाठी केवायसी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. नवीन विद्यार्थिनींना महाविद्यालयाचे ओळख व्हावी प्राध्यापक वर्ग कर्मचारी वर्ग ग्रंथालय वर्ग महाविद्यालय सुविधा नियम आणि शिस्त यांची माहिती व्हावी याकरिता केवायसी नो युवर कॉलेज चे आयोजन करण्यात येते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर देवेंद्र व्यास कला शाखाप्रमुख डॉक्टर विनोद खैरे उपप्राचार्य डॉक्टर अंबादास पांडे आयक्यूएसी समन्वयक प्राध्यापक संजय विटे यांची प्रमुख उपस्थिती होती.इतनी शक्ती हमे देना दाता या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर माताजी व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक संजय विटे यांनी केले. कुमारी दीक्षा पहुरकर, प्रिया बुध निकिता शिरसाट कांचन गुठे, वैष्णवी हलवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्राचार्य डॉक्टर देवेंद्र व्यास यांनी नवीन विद्यार्थिनींना महाविद्यालयाचे विविध उपक्रम अभ्यासक्रम सुविधा शिष्यवृत्ती पुरस्कार अवार्ड नियम विद्यार्थी सहायता निधी कौशल्य अभ्यासक्रम यांची विस्तारपूर्वक माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन कुमारी कल्याणी गावंडे आणि कुमारी जानवी मांडळे यांनी केले.

या कार्यक्रमाला प्रा  इंगळे, प्रा शिंगाडे, प्रा मान मोठे, डॉक्टर मुंद्रे, डॉ नितनवरे, डॉ पाटील, डॉ बंग, डॉ सावजी यानी,  डाॅ बाजपेयी प्रा डॉक्टर रुमाले, डॉक्टर पांडे डॉक्टर कांबळे, प्रा बोरकर, प्रा. धृव, प्रा सागणे प्रा चापके, प्रा निंबाळकर, प्रा आळशी,  प्रा ललित भट्टी, प्रा बंडगर, प्रा. चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News