नीट परीक्षेत जालना जिल्हयातील विद्यार्थ्यांचे यश 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019
  • नीट चा निकाल मंगळवारी ऑनलाईन जाहीर
  • जिल्हयात जाफराबाद तालुक्यात विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक
  • राष्ट्रीय पातळीवरील गुणवत्ता यादीत मात्र जालन्याचे नाव तसे दूरच

जालना : वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा (नीट) चा निकाल मंगळवारी (ता.4) ऑनलाईन जाहीर झाला आहे. जिल्हयात जाफराबाद तालुक्यात विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. राष्ट्रीय पातळीवरील गुणवत्ता यादीत मात्र जालन्याचे नाव तसे दूरच असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रीय पात्रता व प्रवेशपूर्व चाचणी परीक्षेत जालना जिल्हयातील अनेक विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. जालन्यातील शशांक दत्ता क्षीरसागर याने ओबीसी प्रवर्गातून 97.81 टक्के गुण मिळविले आहेत. टेंभूर्णी (ता.जाफराबाद) येथील तुषार धनंजय मुळे याने 92 टक्के गुण मिळविले आहे. नीट परीक्षेत प्रदीप कचरूबा देठे याने 588, विवेक धनंजय पुराणे याने 566, अश्‍विनी संजय गवते हिने 541, नेहा अप्पासाहेब साबळे हिने 511, अजिंक्य सुखदेव वरगणे याने 510, शुभम अशोक मुंढे याने 496, प्रणव प्रदीप साळोख याने 471, शीतल किशोर गायकवाड याने 443 गुण मिळविले आहे.

नीट परीक्षेचा निकाल हा राष्ट्रीय पातळीवरील गुणवत्ता यादीनुसार ठरविला जात असल्याने ऑल इंडिया रॅक असा शेराही गुणपत्रिकेवर देण्यात आलेला आहे. जालना शहर व जिल्हयात वैद्यकीय शिक्षणासाठीच्या प्रवेशपूर्व परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विशेष असा वर्ग वा वातावरण नसल्याने लातूर, नांदेड, अकोला, अहमदनगर आदी ठिकाणी खाजगी क्लासेस करण्यासाठी मुलांना प्रवेश घ्यावा लागतो. यातही विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात एकूण मेडीकल जागा प्रवेशाचा विचार करता मराठवाडा सोडून इतर विभागात प्रवेश आणि क्लासेस मोठ्या प्रमाणात लावले जात असल्याचे चित्र पाहायला मिळते. जालन्यातील लोकांचा लातूरकडे अधिक ओढा असल्याने तिकडेच जादा प्रवेश घेतले जातात, असे टेंभूर्णी येथील प्रा. दत्ता देशमुख यांनी सांगितले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News