‘नीट’, ‘जेईई’ व ‘एम्स्’ परीक्षेत शांभवीज अकॅडमीचे यश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 June 2019

नांदेड - देशपातळीवरील ‘नीट’, ‘जेईई’ व ‘एम्स्’ सारख्या परीक्षेत शांभवीज इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवित नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे ‘एम्स’ या वैद्यकीय प्रवेशाच्या परीक्षेत अदिती गिते ही भारतात २५ वी आली; तर शांभवीजचाच संकेत सिंघनवाड राष्ट्रीय स्तरावरच्या रँकमध्ये २१० व्या क्रमांकावर आला आहे.

नांदेड - देशपातळीवरील ‘नीट’, ‘जेईई’ व ‘एम्स्’ सारख्या परीक्षेत शांभवीज इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवित नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे ‘एम्स’ या वैद्यकीय प्रवेशाच्या परीक्षेत अदिती गिते ही भारतात २५ वी आली; तर शांभवीजचाच संकेत सिंघनवाड राष्ट्रीय स्तरावरच्या रँकमध्ये २१० व्या क्रमांकावर आला आहे.

शांभवीज् अकॅडमीत प्रत्येक विषयासाठी तीन ते चार तज्ज्ञ शिक्षक, सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकाच छताखाली सर्व विषयांचे कोचिंग आणि रिव्हिजनही, नीट, जेईई व एम्स् सोबतच जिपमर तसेच बारावी बोर्ड आदी अभ्यासक्रमांची तयारी करून घेण्यात येते.

तसेच विविध अभ्यासक्रमासाठी वेगवेगळे तज्ज्ञ शिक्षकवृंद या ठिकाणी उपलब्ध असून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिकची व्यवस्था, आपला पाल्य क्लासमध्ये पोचल्याची आणि क्लासमधून बाहेर पडल्याची माहिती ‘एसएमएस’द्वारे पालकांपर्यंत पोचवली जाते. मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका, प्रत्येक वर्गात मर्यादित विद्यार्थी संख्या, वातानुकूलित वर्ग आणि शांभवीजशी संलग्नित असणाऱ्या संस्थेच्या वसतिगृहाची व्यवस्था या ठिकाणी आहे.या वर्षीच्या ‘नीट’ परीक्षेच्या निकालात संकेत शिंघनवाड ९७.४३ टक्के, रत्नेश्वरी यमलवार ९७.२९ टक्के, सय्यद जुनेद ९६.०९ टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे. तसेच अकॅडमीची विद्यार्थिनी अदिती गिते ही ‘नीट’ परीक्षेत ६५९ गुण मिळवत देश स्तरावरील रँकमध्ये १३० वी ठरली असून ‘एम्स्’मध्ये ९९.९७ पर्सेंटाईलसह देशात २५ वी आली आहे.

त्यासोबतच नीट मध्ये फिजिक्स या विषयात १८० पैकी १७१ गुणांसह नांदेड जिल्हयात अव्वल ठरली आहे; तर संकेत सिंगनवाड एम्स् मध्ये देशात २१० आला असून  नीट मध्ये ९७.४३ पर्सेटाईल्ससह तो उत्तीर्ण झाला आहे. दर्शन रेखावार जेईई ॲडव्हान्स् परीक्षेत देशात ६०३ वा आला असून जेईईच्या निकालात ९९.५५ पर्सेटाईल, तसेच ओमकार कवडगी हा चार हजार ७२२ या रँकसह उत्तीर्ण झाला. श्रेय वाघमारे हा देशात एक हजार ८५० रँकने उत्तीर्ण झाला आहे.या शिवाय जेईई मेन्स् मध्ये प्रसाद पेंटे ९७ पर्सेंटाईल्स, श्रेयस सोळंकी ९८ पर्सेंटाईल्स, ओमकार कौटगी ९४ पर्सेंटाईल्स, तेजस पतंगे ९४ पर्सेंटाईल्स, ऋषिकेश क्षीरसागर ९३ पर्सेंटाईल्स, तक्षक अंबेकर ९३ पर्सेंटाईल्स, बाळकृष्ण मुखेडकर ९२ पर्सेंटाईल्स, यश सोनटक्के ९१ पर्सेंटाईल्स, अनिकेत तिवारी, विलास वडजे, ओमकार मांडवकर, अभय शिंदे, अश्विन शिंदे, रंगनाथ गोटे, निखील तोरणे या विद्यार्थ्यांनाही ८० पेक्षा जास्त पर्सेटाईल्स मिळवत यश प्राप्त केले आहे.

उज्ज्वल भवितव्यासाठी आणि विद्यार्थी व पालकांच्या स्वप्नपूर्तीसाठी शांभवीजचा शैक्षणिक लोकसेवेचा संकल्प आहे. येथे आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्यांच्यावर सुसंस्कार आणि योग्य ती सुरक्षितता आदी बाबतची काळजी अत्याधुनिक संसाधनाद्वारे घेतो. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेसोबतच संस्कारीत पिढी निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे.
- सतीश पिलंगवाड, संस्थापक संचालक, शांभवीज् ॲकडमी, नांदेड.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News