संजय घोडावत ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे नीट परीक्षेत यश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

जयसिंगपूर - जेईई, सीईटी, एम्स व नीट या स्पर्धा परीक्षांमध्ये उच्चांकी निकालाची परंपरा जपणारी अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत आय.आय.टी. व मेडिकल ॲकॅडमीच्या पाच विद्यार्थ्यांनी नीट-२०१९ परीक्षेत ६०० हून अधिक गुण मिळवून यश संपादन केले. 

जयसिंगपूर - जेईई, सीईटी, एम्स व नीट या स्पर्धा परीक्षांमध्ये उच्चांकी निकालाची परंपरा जपणारी अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत आय.आय.टी. व मेडिकल ॲकॅडमीच्या पाच विद्यार्थ्यांनी नीट-२०१९ परीक्षेत ६०० हून अधिक गुण मिळवून यश संपादन केले. 

ॲकॅडमीच्या निशांत बिराजदार याने ७२० पैकी ६५९ गुण मिळवून मिळवून देशात ५८७ वा क्रमांक मिळवला. स्टीवन अँटीन- ६५२ (देशात ८६० वा), गोविंद माने- ६३९ (देशात १७६९ वा), सायली पाटील-६३७ (देशात १९३० वा), श्रीरंग रायरीकर-६३० (देशात २७६४ वा) गुण मिळवून यश संपादन केले. तसेच ६५० गुणांवर २, ६०० गुणांवर ५, ५५० गुणांवर १८, तर ५०० गुणांवर २६ विद्यार्थ्यांनी सीईटीमध्ये यश मिळविले.

यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष, उद्यागेपती संजय घोडावत म्हणाले, ‘‘वर्षानुवर्षे उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखत ॲकॅडमीने यशाची घोडदौड सुरू ठेवली आहे. याचा आम्हाला अभिमान आहे.’’ संचालक वासू म्हणाले, ‘‘प्रयत्नांची उंची वाढवली की यशाचे शिखरसुद्धा छोटे वाटू लागते. या वर्षीचा नीटचा निकाल त्याचेच फलित आहे.’’ विद्यापीठाचे विश्‍वस्त विनायक भोसले यांनीही यशस्वी विद्यार्थी, पालक, संचालक श्री वासू व त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News