कोलते पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे यश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 June 2019

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई उन्हाळी-२०१९ लेखी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.

मलकापूर - महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई उन्हाळी-२०१९ लेखी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालात कोलते पॉलिटेक्नीकच्या विद्यार्थ्यांनी  भरघोस यश संपादन केले आहे. जाहीर झालेल्या निकलामध्ये संगणक अभियांत्रिकी शाखेमधील पहिल्या वर्षातील अंकिता शाह यांनी ८०.३८ टक्के गुण प्राप्त करून प्रथम तर वैष्णवी हागे यांनी ७४ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

 याच शाखेमधील दुसऱ्या वर्षातील फरिसा फतेमा सईद यांनी ८७.४७ टक्के प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवीत  या विषयात १०० पैकी ९३ गुण प्राप्त केले आहे. तर नेहा कोलते यांनी ७५.०७ टक्के प्राप्त करून द्वितीय आणि मयुरी कोलते यांनी ७० टक्के प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला आहे. आणखी याच शाखेतील  अंतिम वर्षातील हर्षदा खाचने यांनी ६८.७० टक्के प्राप्त करून प्रथम तर शुभम चौधरी यांनी ६७ टक्के प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. 

यांत्रिकी अभियांत्रिकी शाखे मधील पहिल्या वर्षातील प्रियंका झनके यांनी ८४.५ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवीत गणित या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवित उच्चांक गाठला आहे. तर  तेनुराम बावीस्कार यांनी ८० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. याच शाखेमधील दुसऱ्या  वर्षातील सोनाली वानखडे यांनी ७२.५ टक्के प्राप्त करून प्रथम तर रोशन चंदनशिव यांनी ६७.७ टक्के प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. त्याचप्रमाणे याच शाखेतील अंतिम वर्षातील शुभम क्षीरसागर यांनी ७३.५९ टक्के प्राप्त करून प्रथम तर सय्यद शोएब यांनी ७१.१२ टक्के प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

विद्युत अभियांत्रिकी शाखेमधील पहिल्या वर्षातील महादेव भगत यांनी ७७.३८ टक्के गुण प्राप्त करून प्रथम तर दर्शन काळे यांनी ७१.५० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय तर शोएब पठाण यांनी ७१.१३ टक्के प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला आहे. याच शाखेमधील दुसऱ्या वर्षातील गायत्री भोपळे यांनी ८७.०७ टक्के प्राप्त करून प्रथम तर धनश्री घनोकर यांनी ८०.५३ टक्के प्राप्त करून द्वितीय तर विनायक मुंढे ६६.७७ टक्के प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला आहे. आणखी याच शाखेतील  अंतिम वर्षातील शुभम गोसावी यांनी ७१ टक्के प्राप्त करून प्रथम तर पुनम पानझडे यांनी ७०.५० टक्के प्राप्त करून द्वितीय तर मयुरी चोपडे यांनी ६८.३८ टक्के प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल खर्चे यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News