‘चांद्रयान-२’ मोहिमेचे यश देशासाठी प्रेरणादायी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 29 July 2019

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात जम्मू-काश्‍मीरमध्ये अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी राबवलेली ‘बॅक टू व्हिलेज’ म्हणजेच ‘गावाकडे चला’ ही मोहीम आणि तिचे यश यांचा उल्लेख करून ‘बॉम्ब आणि बंदुकांच्या जोरावर पसरवू पाहणाऱ्यांना काश्‍मिरी जनतेने विकासाच्यासाठी दिलेले हे प्रत्युत्तर असून, दहशतीवर विकासाने मात केली,’’ असे सांगितले. 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात जम्मू-काश्‍मीरमध्ये अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी राबवलेली ‘बॅक टू व्हिलेज’ म्हणजेच ‘गावाकडे चला’ ही मोहीम आणि तिचे यश यांचा उल्लेख करून ‘बॉम्ब आणि बंदुकांच्या जोरावर पसरवू पाहणाऱ्यांना काश्‍मिरी जनतेने विकासाच्यासाठी दिलेले हे प्रत्युत्तर असून, दहशतीवर विकासाने मात केली,’’ असे सांगितले. 

‘चांद्रयान-२’ मोहिमेनंतर विद्यार्थ्यांसाठी सरकार राष्ट्रीय पातळीवर प्रश्नमंजूषा स्पर्धा घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली.लोकसभा निवडणुकीनंतर ‘मन की बात’चा सिलसिला मोदी यांनी पुन्हा सुरू केला आहे. काश्‍मीरच्या शोपियाँ जिल्ह्यातील मोहंमद अस्लम यांनी ‘माय जिओव्ही’वर ‘बॅक टू व्हिलेज’ आणि त्याच्या यशाची माहिती दिली होती. पंतप्रधानांनी त्याचा उल्लेख करून काश्‍मिरी जनता दहशतीच्या नव्हे; तर विकासाबरोबर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले. अमरनाथ यात्रेस यंदा पहिल्या २८ दिवसांत विक्रमी यात्रेकरू गेल्याचे ते म्हणाले.

पाच वर्षांपूर्वी आपल्या सरकारने सुरू केलेली स्वच्छता मोहीम सुंदरतेकडे चालली आहे, हे सांगताना पंतप्रधानांनी राजधानीच्या विविध भागांमध्ये; तसेच कुंभमेळ्यातही स्वच्छतेच्या आणि पथकलेच्या माध्यमातून कार्य करणारे योगेश सैनी यांचे उदाहरण दिले. सणासुदीच्या आगामी काळात येणाऱ्या जत्रा-यात्रांमध्ये पथनाट्ये, प्रदर्शने, भाषणांद्वारे ‘पाणी वाचवा’ मोहिमेला बळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. मॉस्कोत नुकत्याच झालेल्या खास क्रीडा स्पर्धेचा त्यांनी उल्लेख केला. कर्करोगावर मात करणाऱ्या मुलांसाठी झालेल्या या स्पर्धेत विजय मिळवलेल्या मनीष जोशी, हर्ष देवधर, अथर्व देशमुख आदी भारतीय मुलांचे त्यांनी अभिनंदन केले. 

‘चांद्रयान-२’ मोहिमेचे यश हे अनेकानेक अर्थांनी प्रेरणादायी असल्याचे सांगताना पंतप्रधान म्हणाले, ‘‘ विश्वास आणि निर्भयता हे दोन गुण आयुष्यातही किती उपयोगी पडू शकतात हा धडा  ‘चांद्रयान-२’ने दिला.’’

विद्यार्थ्यांसाठी चांद्रयान स्पर्धा
‘चंद्रयान २’ मोहिमेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. एक ऑगस्ट रोजी ‘माय जीओव्ही’ संकेतस्थळावर या स्पर्धेचे तपशील जाहीर होणार आहेत. या स्पर्धेत राज्यांमध्ये अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांना एक खास संधी मिळणार आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले, की ‘चंद्रयान २’ सप्टेंबरमध्ये जेव्हा चंद्रावर प्रत्यक्ष उतरेल, त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावर विजयी विद्यार्थ्यांना नेण्यात येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News