नाशकात विद्यार्थ्यांना मिळणार ॲप्लिकेशन फी परत 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 June 2019

नाशिक - प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी राबविलेल्या प्रवेश प्रक्रियेंतर्गत यापूर्वी पोर्टलद्वारे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शुल्क परत मिळणार आहे. ॲप्लिकेशन फीअंतर्गत अदा केलेल्या शुल्काची रक्‍कम येत्या दोन आठवड्यांत संबंधितांच्या खात्यावर जमा केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील पाच हजार ९५४ विद्यार्थ्यांना याअंतर्गत आपले शुल्क परत मिळणार आहे.

अभियांत्रिकी अभ्यासक्रम बी.ई., बी.टेक. यांसह औषधनिर्माणशास्त्र शाखेतील बी.फार्म, वास्तुशास्त्र शाखेचा बी.आर्क. हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी अभ्यासक्रम बीएचएमसीटी अशा विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी सार पोर्टलद्वारे प्रवेशप्रक्रिया  राबविली होती.

याअंतर्गत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन स्वरूपात अर्ज भरून त्यासाठी प्रवर्गनिहाय ॲप्लिकेशन फी ऑनलाइन स्वरूपात अदा केली होती. मात्र संपूर्ण प्रक्रिया रद्द करत नव्याने प्रवेशाची प्रक्रिया राबविणार असल्याचे स्पष्ट करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी अदा केलेल्या शुल्काचे काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात होता. या संदर्भात राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सूचना जारी केली आहे. याअंतर्गत १७ ते २१ जून या कालावधीत पोर्टलवर भरलेले शुल्क येत्या दोन आठवड्यांत त्यांच्या खात्यावर जमा केले जाणार असल्याचे स्पष्ट  केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News