व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश सुरु 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 July 2019
  • व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना निजाम बंगला वसतिगृहातील प्रवेश खुले
  • छावणी येथील निजाम बंगला वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आई आणि वडिलांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  • समाजकल्याणच्या महाविद्यालयातील वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास ते विद्यार्थी याठिकाणी प्रवेश अर्ज करु शकतील

औरंगाबाद: डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना निजाम बंगला वसतिगृहातील प्रवेश खुले झाले आहेत. याबाबतची माहिती तंत्रशिक्षणचे सहसंचालक डॉ. महेश शिवणकर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्राणेश मुरनाळ यांनी शुक्रवारी (ता. 26) पत्रकार परिषदेत दिली. 

शासकीय आणि खासगी महाविद्यालयात प्रवेश घेणारे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यासाठी पात्र ठरु शकतील. जागा शिल्लक राहिल्यास अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनाही परवानगी देण्यात येणार आहे. कोणत्याही महाविद्यालयात प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. छावणी येथील निजाम बंगला वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आई आणि वडिलांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे. समाजकल्याणच्या महाविद्यालयातील वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास ते विद्यार्थी याठिकाणी प्रवेश अर्ज करु शकतील. वसतिगृहाची क्षमता 100 इतकी आहे. विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्यासाठी योजनेतून येणारे एक हजार रुपये द्यावे लागणार आहेत. वसतिगृहाचे व्यवस्थापन विश्‍वकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे राहुल तायडे करणार आहे. 

विद्यार्थ्यांना उस्मानपुरा येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मुलांचे वसतिगृह कार्यालय किंवा छावणीतील डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत निजाम बंगला येथे सुटीचे दिवस वगळून सकाळी 11 ते 5 यावेळेत भेटावे. छावणी येथील वसतिगृहाची पाहणी करुन प्रवेशासाठी भरलेला अर्ज व कागदपत्राची सत्यप्रती जोडून महाविद्यालय प्राचार्यांच्या शिफारसीसह अर्ज द्यावा. अर्ज छाननी झाल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News